पिंडदानसाठी पॉलाने गिरविले मराठी धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 16:01 IST
मराठी चित्रपटांची भुरळ आता परदेशी कलाकारांना देखील पडु लागली आहे. बºयाच मराठी सिनेमांमध्ये ...
पिंडदानसाठी पॉलाने गिरविले मराठी धडे
मराठी चित्रपटांची भुरळ आता परदेशी कलाकारांना देखील पडु लागली आहे. बºयाच मराठी सिनेमांमध्ये आपल्याला इंटरनॅशनल अॅक्टर्स दिसत आहेत. पिंडदान या आगामी सिनेमात देशील कॅनेडियन अॅक्ट्रेस पॉला मॅगलम हिच्या अभिनयाची जादु पहायला मिळणार आहे. मनवा नाईक व सिद्धार्थ चांदेकर यांच्या भुमिका असलेला पिंदडान हा सिनेमा पॉला मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. अतिशय सुंदर दिसणारी ही अभिनेत्री मराठी सिनेमात येतीये खरी पण ती मराठी बोलणार का हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. परंतू पॉला फक्त शोभेची बाहुली म्हणुन या चित्रपटात वावरणार नसुन तिने संवाद देखील म्हटले आहेत. परदेशी कलाकार मराठी बोलणार म्हणजे त्यांच्याच अॅसेन्टमध्ये आपल्याला ती मराठी भाषा सहन करावी लागणार असे नक्कीच प्रेक्षकांना वाटेल. पॉलाने मात्र अस्सलीखीत मराठी बोलण्यासाठी चांगलेच धडे गिरविले आहेत. तिने गायंत्री मंत्र शिकला अन नुसता शिकलाच नाही तर त्याचा अर्थ देखील जाणुन घेतला आहे. पॉला म्हणतीये, मी जे संवाद म्हणणार आहे त्याचे अर्थ जर मला समजले तर मी ते लक्षात ठेवू शकते अन त्याप्रकारेच मला एक्सप्रेशन देणे सोपे जाईल. पिंडदानमध्ये पॉला ब्रिटीश गर्ल अॅनाचा रोल करीत आहे. जी भारतात येते अन भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडुन इथेच राहण्याचा निर्णय घेते. या रोलसाठी तिला दिग्दर्शक अन सहकलाकारांनी मदत केल्याचे ती सांगते.