Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘पोश्टर बॉईज’ चक्क हिंदीत..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 21:52 IST

मराठी सिनेमातला हॅँडसम अभिनेता श्रेयस तळपदे आता बॉलिवूडमध्ये एक आगळा वेगळा धमाकेदार, कॉमेडी सिनेमा दिग्दर्शित करणार असून बॉलिवूड भरारीसाठी ...

मराठी सिनेमातला हॅँडसम अभिनेता श्रेयस तळपदे आता बॉलिवूडमध्ये एक आगळा वेगळा धमाकेदार, कॉमेडी सिनेमा दिग्दर्शित करणार असून बॉलिवूड भरारीसाठी सज्ज झाला आहे. मराठीसृष्टीत श्रेयसने निर्माता म्हणून पदार्पण केलेला ‘पोश्टर बॉईज’ हा सिनेमा आता बॉलिवूड रिमेकच्या प्रदर्शनासाठी तयार झाला आहे. निर्माता-दिग्दर्शक म्हणून श्रेयसने आपली कामगिरी मराठीसृष्टीत चोख बजावली आहे. आता श्रेयस हिंदीत दिग्दर्शनासाठी पदार्पण करीत आहे. मराठीतील पोश्टर बॉईज आता बॉलिवूडमधील लोकांना खिळखिळून हसवायला येणार आहे. यात बॉबी देओेल, सनी देओल आदी कलाकार पाहायला मिळणार आहेत मात्र तिसरा कलाकार कोण असणार हे अद्याप अजून कळलेलं नाही.