Join us
Daily Top 2Weekly Top 5

या अभिनेत्रीने शेअर केले एगेंजमेंटमधील खास क्षण, 'दिल दोस्ती दुनियादारी'मुळे झाली होती फेमस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 12:57 IST

आता हे दोघं लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

अभिनेत्री पूजा ठोंबरेचा काही दिवसांपूर्वी कुणाल अहिररावसोबत नाशिकमध्ये साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे  काही खास फोटो पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हा सोहळा कौटुंबिक पद्धतीने पार पडला. यावेळी पूजा  खुपच सुंदर दिसत होती. त्या दोघांच्या फोटोवर इंस्टाग्रामवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना पहायला मिळतो आहे. आता हे दोघं लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

पूजाने 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत अ‍ॅना नावाची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे कौतुक सगळीकडेच झाले होते. या मालिकेत उलटसुलट प्रश्न विचारून इतर कलाकारांना गोंधळात टाकणारी अ‍ॅना ही तरूणाचींच नाही तर लहान मुलांची देखील फेव्हरेट झाली होती. त्यानंतर ती अमर फोटो स्टुडिओ या नाटकातून रसिकांच्या भेटीला आली होती. 

पूजा मुळची औरंगाबाद येथील बीड जिल्ह्यातील आहे. येथील केएसके महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी पूजा ठोंबरे हिने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच आपली मोठी फॅन फॉलोईंग निर्माण केली आहे.

तिने शालेय जीवनापासून ते आतापर्यंत बरेच पुरस्कार पटकावले आहेत. ई टीव्ही, झी मराठी तसेच विविध दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून अभिनय व नृत्याचे कसब पणाला लावत मराठी रंगभूमीवर अभिनयाची छाप पाडत तिने मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे.

टॅग्स :झी मराठी