Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा सावंत सिद्धेश चव्हाणसोबत या दिवशी अडकणार विवाहबंधनात, सांगितला लग्नाचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 18:09 IST

Pooja Sawant : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पूजाने काही दिवसांपू्र्वीच सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पूजाने काही दिवसांपू्र्वीच सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली. सिद्धेश चव्हाणबरोबर साखरपुडा केल्याचं सांगत पूजाने तिच्या मिस्ट्री मॅनचं गुपितंही उघडलं. त्यानंतर पूजाची लव्हस्टोरी आणि तिच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकतेच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत लग्नाचा प्लान सांगितला आहे.

अभिनेत्री पूजा सावंत पुढील वर्षी म्हणजेच २०२४मध्ये लग्नगाठ बांधणार आहे. नुकतेच तिने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाचा प्लान सांगितला आहे. पूजा म्हणाली, माझे लग्नाबद्दल खूप प्लान्स आहेत. कारण, लहानपणापासूनच लग्न करायचे ही माझी मनापासून इच्छा होती. त्यात मला ‘पर्पल वेडिंग’चं खूप आकर्षण आहे. मात्र आपल्या मराठी लोकांमध्ये लग्न लागताना पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसावी लागते. मला मनातून जांभळ्या रंगाची नऊवारी नेसण्याची खूप इच्छा आहे पण, घरच्यांनी आधीच पिवळ्या साडीबद्दल सांगितले आहे. जांभळ्या रंगाच्या साडीसाठी मला घरून कोणीच परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मी आपल्या परंपरा, रितीरिवाज सांभाळून लग्नाचे प्लान्स करणार आहे. साडीशिवाय माझ्या आई-बाबांनी मला कोणत्याच गोष्टीचे बंधन घातलेले नाही. 

लग्नाच्या ठिकाणाबद्दल पूजाने सांगितले की, सिद्धेशचं यावर काहीच म्हणणं नाहीये. सगळे प्लॅन्स माझे आहेत. सध्या डेस्टिनेशन वेडिंगची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसं झालं तरी चालेल पण, मला मुंबईत लग्न करायचंय. जिथे माझा जन्म झालाय, माझी जवळची माणसं मुहूर्तावर वेळेत पोहोचू शकतात त्याठिकाणी माझं लग्न व्हावं. आता सध्या जागेबद्दल काहीच ठरवलेलं नाही.” असं पूजा सावंतने सांगितलं.

 

टॅग्स :पूजा सावंत