Join us

​पूजा सावंत सांगतेय, तो कायम राहील हृदयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 14:50 IST

पूजा सावंतने नुकतेच ट्विटरच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना एक गोष्ट सांगितली आहे. तिने ट्विटरवर सांगितले आहे की, रस्त्यावरून जात असताना ...

पूजा सावंतने नुकतेच ट्विटरच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना एक गोष्ट सांगितली आहे. तिने ट्विटरवर सांगितले आहे की, रस्त्यावरून जात असताना कोणीतरी भेटले आणि त्याने कायमचे हृदयात स्थान मिळवले. आता पूजाला रस्त्यात कोण भेटले आणि तिच्या हृदयात कोणी स्थान निर्माण केले हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. तर पूजाला काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून जाताना एक कुत्रा दिसला होता. हा कुत्रा तिला पाहाताच क्षणी इतका आवडला की, या कुत्र्याने तिच्या हृदयात स्थान निर्माण केले असे तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगितले आहे. एवढेच नव्हे तर या कुत्र्यासोबतचा छानसा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पूजा सावंतने क्षणभर विश्रांती, सतरंगी रे, दगडी चाळ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या सगळ्याच चित्रपटातील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत. आज एक अभिनेत्री म्हणून तिने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. पोस्टर बॉइज या चित्रपटात अनिकेत विश्वासरावसोबत तिची केमिस्ट्री खूपच चांगली जुळून आली होती. तिच्या या चित्रपटाची चांगली चर्चा देखील झाली होती. पूजा ही एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारी अभिनेत्री आहे. पूजाला सामाजिक कार्य करण्याची आवड आहे. तिला कुत्र्यांविषयी तर खूप प्रेम आहे. तिला रस्त्यांवरील कुत्र्यांविषयी तर जास्तच आपुलकी आहे. काही दिवसांपूर्वी पूजाने एका छोट्या कुत्र्याला देखील घरी आणले होते. या अनाथ कुत्र्याला तिने आपलेसे केले. गटारात पडलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला पूजाच्या भावाने पाहिले होते आणि त्याने त्या छोट्याशा पिल्लाला घरी आणले होते. गटारात पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली होती. पूजाने त्या कुत्र्याच्या पिल्लाला पाहिल्यावरच त्याला घरी ठेवण्याचा निर्णय घेतला. पूजा एवढ्यावरच थांबली नाही तर तिने त्या कुत्र्याला दवाखान्यात देखील नेले होते. त्याच्यावर योग्य ते उपचार केले. त्यानंतर ते पिल्लु पूजाच्या घरत मस्त रुळले. पूजाने नेहमीच रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांना आपलेसे केले आहे. त्याची काळजी घेतली आहे. त्यांच्यासाठी ती खायलाही घेऊन जाते. Also Read : पूजा सावंतचा स्टनिंग लूक,सोशल मीडियावर व्हायरल