Join us

"वेध पहिल्या मकरसंक्रांतीचे..." पूजा सावंतची खास तयारी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:06 IST

पूजा सावंतला पहिल्या मकर संक्रांतीचे वेध लागले आहेत.

Pooja Sawant First Makar Sankranti: मकर संक्रांती हा या वर्षातील पहिला सण (Makar Sankranti २०२५ ) आहे. मराठी कलाकारसुद्धा अत्यंत जल्लोषात हा सण साजरा करणार आहेत. काहींसाठी ही लग्नानंतरचा पहिली मकर संक्रांत असणार आहे. यासाठी कलाकारांकडून विशेष तयारीदेखील सुरू आहे. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पुजा सावंत हिचीदेखील ही लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे. 

पूजा सावंतने गेल्यावर्षी म्हणजे २८ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या थाटामाटात सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली होती. सिद्धेश हा इंजिनीयर असून कामानिमित्त तो ऑस्ट्रेलियाला असतो. लग्नानंतर पूजादेखील परदेशात स्थायिक झाली आहे. काम आणि शूटिंगनिमित्त ती भारतात येत असते. लग्नानंतर अभिनेत्री परदेशात गेली असली तरी अनेक मराठी सण, उत्सव व समारंभ अगदी थाटामाटात आणि उत्साहात साजरे केले. अशातच आता तिला पहिल्या मकर संक्रांतीचे वेध लागले आहेत.

पूजा सावंत लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीची खास तयारी करत आहे. येत्या मकर संक्रांतीनिमित्त तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. "वेध मकरसंक्रांतीचे" असं म्हणत पूजाने हळव्याच्या दागिन्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आकर्षक मंगळसूत्र पाहायला मिळत आहेत. आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या-वहिल्या मकर संक्रांतीसाठी पूजा उत्सुक असल्याचं दिसतंय. 

पूजा सावंतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची 'मुसाफिरा' या चित्रपटात झळकली होती. यात तिच्यासोबत पुष्कर जोग, दिशा परदेशी आणि पुष्कराज चिरपुटकर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. पूजा "क्रॅक' चित्रपटातील एका गाण्यात विद्युत जामवालबरोबर डान्स करताना दिसली होती. तसेच तिचं 'नाच गो बया' हे गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. आता चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल उत्सुकता  आहे. 

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रिटीमराठी अभिनेतामकर संक्रांती