Join us  

पूजाचे साडीतले फोटोशूट पाहून फॅन्स झाले क्रेझी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 7:15 AM

 पूजाच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी पूजाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत पूजाने पिवळ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. साडीत पूजाच्या सौंदर्याला चार चांद  लागले आहे.  पूजाच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.

यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. काही महिन्यांपूर्वी पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती. तिच्या या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतुक झाले होते.

टॅग्स :पूजा सावंत