Join us

पूजा सावंतने घुबडाला दिले जीवनदान, नेटकरी करताहेत तिचे कौतुक, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 15:17 IST

पूजा सावंतचे मुक्या प्राणी आणि पक्ष्यांवर जीवापाड प्रेम आहे आणि आतापर्यंत तिने बऱ्याच पक्षी व प्राण्यांना जीवनदान दिले आहे.

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती ही पूजा तिच्या फॅन्सना देत असते. सगळ्यांनाच माहित आहे की, पूजा सावंतचे मुक्या प्राणी आणि पक्ष्यांवर किती प्रेम आहे. तीच नाही तर तिच्या कुटुंबातील सर्वांनाच प्राण्यांची खूप ओढ आहे. तिच्या घरात पोपट, खारूताई, मांजर अशी बरीच मंडळी राहतात. मात्र आता सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या व्हिडीओत चक्क तिने जखमी घुबडाला जीवनदान दिले आहे. 

पूजा सावंतने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती सांगते आहे की आता उन्हाळा जवळ आला आहे आणि असे बरेच पक्षी आपल्याला आढळतात. जे तहानलेले आहेत, मग ते पाणी पिण्यासाठी जातात आणि पाण्याच्या टाकीत पडतात. किंवा त्यांच्यासोबत अनेक अपघात घडतात. त्यात ते जखमी होतात. असेच घुबड आम्हाला सापडले.  आम्हाला फोन आला की एका पाण्याच्या टाकीमध्ये  घुबड पडला आहे. आम्ही तिथे पोहचेपर्यंत त्यांनी त्याला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले होते. पण ते खूप अशक्त दिसत होते. तहानलेले होते. त्याला लगेच उपचाराची गरज होती. माझ्याकडील बेसिक उपचार मी त्याच्यावर केल्या आणि त्याला पशुवैद्याकडे घेऊन गेले. त्याच्यावर योग्य उपचार झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा दिसू लागली. जेव्हा आम्हाला कळलं की हे घुबड आता उडू शकते तेव्हा आम्ही त्याला हवेत सोडायचे ठरविले. 

सध्या पूजा सावंत फिल्मसिटीमध्ये शूटिंग करते आहे. तिथल्या जंगलात तिने या घुबडाला सोडले आहे आणि तो आता आनंदी असेल, अशी आशा तिने यावेळी व्यक्त केली.

पूजा सावंतने यापूर्वीदेखील अनेक पक्षी आणि प्राण्यांना जीवनदान दिले आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते तिचे खूप कौतूक करत आहे. खरंच तिच्या या कृतीचे कौतूक करू तितके कमीच आहे.

टॅग्स :पूजा सावंत