Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा सावंत बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2016 08:30 IST

गिरगाव चौपाटीवर रविवारी मेक इन इंडिया अंतर्र्गत महाराष्ट्र रजनीचा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या रंगमंचावर अमिताभ ...

गिरगाव चौपाटीवर रविवारी मेक इन इंडिया अंतर्र्गत महाराष्ट्र रजनीचा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या रंगमंचावर अमिताभ बच्चन यांनी कवितादेखील सादर केली. यानंतर रंगमंचावर पूजा सावंतची लावणी सुरू असताना अचानक रंगमंचाला आग लागल्याचे उपस्थितांच्या लक्षात आलं. पहाता, पहाता या आगीने रूद्र रूप धारण केले.नशीब बलवत्तर म्हणून या दुर्घटनेतून रंगमंचावरील कलाकार आणि प्रेक्षक थोडक्यात बचावले.तसेच अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नाने प्रेक्षक व कलाकारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.     या दुदेर्वी घटनेनंतर बचावल्यानंतर पूजाने ट्विीट केले की, मी अगदी सुरक्षित असून सुखरूप घरी पोहचले आहे. मुंबई पोलिस आणि अग्निशामक दलाचे खूप आभार मानते. तसेच मी सध्या खूप घाबरले असून कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नसून ही माझ्यासाठी एक दुर्देवी घटना आहे.