Join us

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण निघाले हनीमूनला, एअरपोर्टवरचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 19:04 IST

Pooja Sawant : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली. २८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) नुकतीच विवाहबंधनात अडकली. २८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली. मोठ्या धुमधडाक्यात पूजाचा  विवाह सोहळा पार पडला. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पूजा आणि सिद्धेशने सात फेरे घेतले. लग्नानंतर नुकतीच पूजा पती सिद्धेशसोबत सिद्धीविनायक मंदिरात स्पॉट झाली होती. दरम्यान, आता पूजा सावंत सिद्धेशसोबत हनीमूनला निघाली आहे. तिचा एअरपोर्टचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. 

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांच्या लग्नाला ७ दिवस उलटले आहेत आणि ते दोघे हनीमूनसाठी रवाना झाले आहेत. मुंबई एअरपोर्टवरचा पूजाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्या दोघांना सोडायला पूजाची बहिण रुचिरा आल्याचे दिसत आहे. यावेळी पूजाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हातात हिरवा चुडा, मंगळसूत्र अशा गेटअपमध्ये नववधू खूप सुंदर दिसते आहे. तर सिद्धेशने ब्राउन रंगाचं टीशर्ट, काळे जॅकेट, ग्रे जिन्स आणि सफेद शूज घातले आहेत. पूजाचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. 

पूजा आणि सिद्धेशला हनीमूनला जात आहेत की ऑस्ट्रेलियाला ते अद्याप समजू शकलेले नाही. कारण पूजाचा नवरा सिद्धेश ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत. त्यामुळे ते दोघे नक्की हनीमूनला गेले आहेत की त्या घरी हे येत्या काही काळात समजेल. पूजाने काही महिन्यांपूर्वीच सिद्धेश चव्हाणबरोबरचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर तिने गुपचूप साखरपुडाही केला होता. आता सिद्धेशबरोबर लग्न करुन तिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सिद्धेश हा डिस्नी कंपनीत कामाला आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो. 

टॅग्स :पूजा सावंत