Join us

गोवा फेस्टीव्हलमध्ये पिंडदान हाऊसफुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 13:46 IST

 पिंडदान या चित्रपटाची चर्चा कित्येक दिवसापासून रंगत आहे. तसेच या चित्रपटाने सोशलमिडीयावरदेखील वा वा मिळविली. आता या चित्रपटाने थेट ...

 पिंडदान या चित्रपटाची चर्चा कित्येक दिवसापासून रंगत आहे. तसेच या चित्रपटाने सोशलमिडीयावरदेखील वा वा मिळविली. आता या चित्रपटाने थेट गोवा फिल्म फेस्टीव्हलच हाऊसफुल केला आहे. या फेस्टिवल मध्ये पिंडधान या चित्रपटाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. तसेच या चित्रपटाची कथा आणि त्यातवापरले गेलेले तंत्रज्ञान याचे देखील विशेष कौतुक करण्यात आले. खरतरं गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये फक्त २ शो पिंडदान चे ठेवण्यात आले होते. दोन्ही शो हाऊसफूल गेल्यामुळे तिसरा शो ही ठेवा अशी विनंती प्रेक्षकांकडून करण्यात आली. १७ जून रोजी प्रदर्शित होणाºया पिंडदान चित्रपटाच वेगळेपण म्हणजे यातली अनोखी जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मुळची कॅनडियन असलेली पॉला यांची जोडी या चित्रपटातून दिसणार आहे.