पिंडदानचे पोस्टर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 11:59 IST
चित्रपट कोणताही असो त्याचे पासेटर त्या सिनेमासाठी अत्यंत महत्वाचे असते. प्रेक्षकांमध्ये एखाद्या चित्रपटाविषयी जेव्हा ...
पिंडदानचे पोस्टर आऊट
चित्रपट कोणताही असो त्याचे पासेटर त्या सिनेमासाठी अत्यंत महत्वाचे असते. प्रेक्षकांमध्ये एखाद्या चित्रपटाविषयी जेव्हा क्युरिओसिटी निर्माण होते तेव्हा प्रेक्षक त्या सिनेमाच्या पोस्टरची आतुरतेने वाट पाहतात. चित्रपटाच्या पोस्टरची पहिली झलक जेव्हा आऊट होते त्यावरुनच त्या सिनेमाविषयी त्याच्या कथेविषयी वेगवेगळ््या चर्चांना उत येतो अन नक्की सिनेमा कशाविषयी आहे याची उत्सुकता लागुन राहते. काही वेळेस त्या पोस्टरवरुन आपण सिनेमा पहायचा कि नाही हे देखील प्रेक्षक ठरवुन मोकळे होतात. त्यामुळे संपुर्ण टिमला पोस्टर रिलीज करण्यापुर्वी फारच काळजी घ्यावी लागते. योग्य कॅरेक्टर्स त्या पोस्टरवर येणे गरजेचे असते. आता पहा ना बºयाच दिवसांपासुन चर्चेत असलेला पिंडदान या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सिद्धार्थ चांदेकर अन मनवा नाईक यांच्या प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट एक रहस्यमय प्रेमकहाणी असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये सिद्धार्थ चांदेकर, मनवा नाईक आणि एक अनोखा चेहरा दिसत आहे. आता ही तिसरी हिरोईन नक्की कोण आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली असणार ना. तुर्तास या पोस्टरकडे पाहुन वेगवेगळे तर्कवीतर्क लावले जाणार हे मात्र नक्की.