Join us

​‘पिंडदान’चा म्युझिक आणि ट्रेलर लॉन्च सोहळा उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 22:20 IST

रहस्यमय प्रेमकथेवर आधारित असलेला ‘पिंडदान’ हा नवा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रशांत पाटील यांनी या सिनेमाचे ...

रहस्यमय प्रेमकथेवर आधारित असलेला ‘पिंडदान’ हा नवा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रशांत पाटील यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून सिद्धार्थ चांदेकर, मनवा नाईक, प्रसाद पंडित, संजय कुलकर्णी, माधव अभ्यंकर, फरीदा दादी आदी कलाकारांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. ‘पिंडदान’ सिनेमाचा शानदार म्युझिक आणि ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. सिनेमाची संपूर्ण टीम ह्या सोहळ्याला उपस्थित होती. फॅशन फोटोग्राफीमध्ये ‘बंटी-प्रशांत’ या नावाला विशेष ग्लॅमर आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत पाटील यांनी केले असून बंटी देशपांडे यांनी छायाचित्रण केले आहे. ही एक अनोखी प्रेमकथा आहे. उदय पिक्चर्स, अश्तिका इरा एलएलपी यांची निर्मिती असलेला ‘पिंडदान’ सारथी एन्टरटेनमेंटच्या पूनम शेंडे प्रस्तुत करत आहेत. या सिनेमात सिद्धार्थ आणि मनवा या दोघांचा नवा हटके अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वांनाच आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता आहे.