Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फुलाला सुगंध मातीचा' फेम गायिका किर्ती किल्लेदारने बांधली लग्नगाठ, व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 16:11 IST

Kirti Killedar : फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेच्या शोर्षक गीताची गायिका म्हणजेच किर्ती किल्लेदार हिने देखील लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. स्टार प्रवाह वरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील पश्या म्हणजेच आकाश नलावडेचेही नुकतेच लग्न पार पडले. त्यानंतर आता फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेच्या शोर्षक गीताची गायिका म्हणजेच किर्ती किल्लेदार हिने देखील लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

किर्ती किल्लेदार हिने आज प्रियकर मंथन त्रिवेदीसोबत इंदौर येथे लग्नगाठ बांधली आहे. किर्ती किल्लेदारच्या लग्नातला व्हिडीओ गायक मंगेश बोरगावकर याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, अभिनंदन आनंदी कपल. तुमच्यासाठी मी खूप खूश आहे. या व्हिडीओत मंथन किर्तीच्या भांगेत कुंकू भरताना दिसत आहे. त्यानंतर या व्हिडीओत मंगेशने एक सेल्फीनं शेअर केला आहे. ज्यात तो आणि त्याची पत्नीदेखील दिसत आहे. 

गेल्या महिन्यात किर्तीने व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी आपल्या बॉयफ्रेंड सोबतचा फोटो शेअर करून प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली होती. किर्ती आणि मंथन हे दोघेही पुण्यातच वास्तव्यास आहेत. 

दुनियादारी चित्रपटातील किर्तीने देवा तुझ्या गाभाऱ्याला हे गाणं गायलं होतं. तर तानाजी बॉलिवूड चित्रपटातील हे माय भवानी हे गाणं तिने स्वरबद्ध केलेलं आहे. किर्तीने आजवर चित्रपट, मालिका शीर्षक गीत तसेच अल्बमसाठी गाणी गायली आहेत. सोबतच विविध मंचावर तिने गाणी गायली आहेत.