Join us
Daily Top 2Weekly Top 5

Photos : प्रिया बापटने शेअर केला पाच वर्षांपूर्वीचा फोटो, तिचा बोल्ड अंदाज पाहून व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 17:19 IST

प्रिया बापटने इंस्टाग्रामवर एक पाच वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने काळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे.

अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते. नुकताच तिने एक पाच वर्षांपूर्वीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

प्रिया बापटने इंस्टाग्रामवर एक पाच वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने काळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले की, हा खूप जुना फोटो आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वीचा आहे. यापूर्वी हा फोटो मी शेअर केला नव्हता. 

प्रिया बापटचा हा फोटो पाहून कुणी म्हणेल का की हा पाच वर्षांपूर्वीचा दिसेल. यातील तिचा बोल्ड अंदाज घायाळ करणारा आहे. तिचा हा फोटो तेजस नेरूरकरच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. तर तिचा मेकअप विनोद सरोदेने केला आहे.  

गेल्या काही दिवसांपासून प्रिया तिच्या सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. नागेश कुकुनूर यांनी या वेबसिरीचे दिग्दर्शन केले आहे. या वेबसिरिजमध्ये काही बोल्ड सीन्स प्रियाने दिले आहेत. प्रिया बापट मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नाव आहे. मराठीमध्ये प्रियाने अनेक उत्कृष्ट कलाकृतींमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाने चारचाँद लावले आहेत.

'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रियाच्या अभिनयाचे  प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही कौतुक केले.

हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली.

'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या माध्यमातून प्रिया डिजिटल माध्यमात देखील आपली छाप उमटवली आहे. 

टॅग्स :प्रिया बापट