स्पृहा करणार विविध साड्यांमधील फोटो शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 17:11 IST
आपल्या अभिनयाने व कवितेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी स्पृहा जोशी. सोशल मिडियावर ब-यापैकी सक्रिय असते. स्पृहाने आता थेट शंभर ...
स्पृहा करणार विविध साड्यांमधील फोटो शेअर
आपल्या अभिनयाने व कवितेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी स्पृहा जोशी. सोशल मिडियावर ब-यापैकी सक्रिय असते. स्पृहाने आता थेट शंभर साडीपॅक्ट सुरु केले आहे. यामध्ये स्पृहा विविध साड्यांमधील फोटो शेअर करणार आहे. स्पृहाने नुकतीचं एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काळ्या रंगाची आणि सोनेरी बुट्टी असलेली सुंदर साडी परिधान केली आहे. या लूकमध्ये ती एकदम झक्कास दिसत आहे. विशेष म्हणजे ही साडी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने डिझाइन केली आहे. तसेच स्पृहाने फोटोसह एक पोस्टही शेअर केली आहे. त्यात तिने म्हटले की, लहानपणी आईची भलीमोठी साडी झेपत नसताना गुंडाळण्यापासून सुरु झालेला हा प्रवास.. आता जाणवतात, ती तिची सुंदर सुंदर रूपं आणि प्रत्येक साडीसोबत जडलेली एक हवीहवीशी आठवण. तिचा रंग, पोत, आणि असंख्य फिलींग्झ.. त्यामुळे मी काही जुन्या आठवणी श्ंभर साडीपॅक्ट द्वारे शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे.