Join us

Photo: 'बरं झालं शाळेत असताना नाही भेटलो'; मितालीच्या लहानपणीच्या फोटोवर सिद्धार्थची कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 15:15 IST

Siddharth chandekar: मितालीने तिच्या शाळेतला एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर सिद्धार्थने कमेंट करत तिची मस्करी केली आहे.

मराठी कलाविश्वातील गोड कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar) आणि मिताली मयेकर (mitali mayekar). उत्तम अभिनयासह ही जोडी त्यांच्यातील बेस्ट कमिस्ट्रीमुळेही कायम चर्चेत येत असते. ही जोडी उत्तमरित्या त्यांचं वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत. विशेष म्हणजे हे दोघं एकमेकांचे नवरा-बायको असण्यापेक्षाही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांचं बॉण्डिंग आणखी छान झालं आहे. ही जोडी कायम एकमेकांच्या पोस्टवर भन्नाट कमेंट करत असतात. अशी एक कमेंट सिद्धार्थने मितालीच्या पोस्टवर केली आहे.

मिताली मयेकर सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. यात ती शाळेत असताना कशी दिसायची आणि मोठी झाल्यावर तिच्या लूकमध्ये कसा बदल झालाय हे तिने या फोटोच्या माध्यमातून सांगितलं आहे.

मितालीने तिचे फोटो पोस्ट केल्यावर नेटकऱ्यांनी त्यावर अनेक कमेंट केल्या. मात्र, या सगळ्यात सिद्धार्थने केलेली कमेंट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बरं झालं शाळेत असताना नाही भेटलो आपण, अशी भन्नाट कमेंट त्याने केली आहे. त्याचीही कमेंट पाहिल्यावर अनेकांनी त्यालाही रिप्लाय दिले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर पुन्हा या जोडीची चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :मिताली मयेकरसिद्धार्थ चांदेकरसेलिब्रिटी