Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मेरे देवता, मेरे राजे...", रायगडावरील फोटो पोस्ट करत प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट, हातावरील टॅटूने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 15:48 IST

अंकित छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धास्थान मानतो. त्याने त्याच्या हातावरही राजे असा टॅटू काढला आहे. नुकतंच त्याने रायगडावरील एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

टीव्ही मालिकांमध्ये काम करून घराघरात पोहोचलेला अंकित मराठी सिनेसृष्टीतीलही लोकप्रिय चेहरा आहे. विशेषत: ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी तो ओळखला जातो. 'महाभारत' या हिंदी मालिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. यामध्ये त्याने अश्वत्थामा ही भूमिका साकारली होती. त्यानंतर अंकित इतरही हिंदी मालिकांमध्ये झळकला. हिंदी टीव्ही विश्वातील आघाडीचा चेहरा असलेल्या अंकितला 'फर्जंद'मधून मराठीत पहिला ब्रेक मिळाला.

दिग्पाल लांजेकरांच्या 'फर्जंद'नंतर अंकित 'पावनखिंड', 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांतही झळकला. प्रेक्षकांनीही त्याला या भूमिकांमध्ये पसंत केलं. अंकित छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धास्थान मानतो. त्याने त्याच्या हातावरही राजे असा टॅटू काढला आहे. नुकतंच त्याने रायगडावरील एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. "मेरे देवता , मेरे राज़े, मेरे भगवान , मेरे राज़े...मेरे राज़े मेरे साथ तो चिंता की कोई नहीं बात...छत्रपति शिवाजी महाराज की जय", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 

अंकितने रोडीजमधून कलाविश्वात पाऊल ठेवलं होतं. अनेक मालिका आणि चित्रपटांत काम करून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. २०१५ साली त्याने मराठमोळी अभिनेत्री रुची सवर्णशी लग्नगाठ बांधली. त्यांना रुआन हा मुलगा आहे. अंकित 'वीर मुरारबाजी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :अंकित मोहनमराठी अभिनेता