Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुमीत पुसावळेनंतर आता पावनखिंड फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 17:21 IST

आतापर्यंत या अभिनेत्याने अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकानंतर एक सेलिब्रिटी लग्नबेडीत अडकत आहेत. अक्षया देवधर व हार्दिक जोशीने लग्नगाठ बांधली. त्याच दिवशी अभिनेता आशय कुलकर्णीहीचा विवाह संपन्न झाला. या यादीत आणखी एक अभिनेत्याचं नाव सामील झालं आहे. पावखिंड फेम हरीश दुधाडे (Harish Dudhade ) ने लग्नगाठ बांधली आहे. हरीशच्या लग्नाचे फोटो अभिनेता अंकित मोहनने शेअर केले आहेत. त्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हरीशनं ही काही वेळापूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर लग्नाचा फोटो शेअर केला. चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आणि नव्या प्रवासाला सुरुवात असं कॅप्शन त्याने या फोटोसोबत दिलं आहे. हरीशच्या पत्नीचं नाव समृद्धी निकम आहे. हरीशची एक नवी इनिंग आता सुरुवात झाली आहे.

मुळच्या नगरच्या असलेल्या हरीशने शाळेतल्या एकांकिकांपासून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर गणेशोत्सवात ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ला या एकपात्री प्रयोगातील प्रवेश सादर केले. फत्तेशिक्त’मधील बहिर्जी नाईक अशा उत्तमोत्तम भूमिकांतून आपल्या अभिनयाचं नाणं अभिनेता हरीश दुधाडेनं खणखणीत वाजवलं आहे. कन्यादान’ ‘गुंडा पुरुष देव’, ‘सुहासिनी’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘नकळत सारे घडले’, ‘तुझ्या इश्काचा नाद खुळा’, ‘सरस्वती’, ‘तुमची मुलगी काय करते’ अशा उत्तमोत्तम मालिका हरीशच्या वाट्याला आल्या. या मालिकांतून हरीश घराघरांत पोहोचला. 

टॅग्स :सेलिब्रिटी