पार्थचे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 19:03 IST
कलाकार हा कलेला नेहमीच प्राधान्य देत असतो. तो कलेसाठी काहीही करण्यास तयार असतो. आता हेच पाहा ना, बारावी हा ...
पार्थचे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज?
कलाकार हा कलेला नेहमीच प्राधान्य देत असतो. तो कलेसाठी काहीही करण्यास तयार असतो. आता हेच पाहा ना, बारावी हा करिअरचा टप्पा मानला जातो. त्यामुळे प्रत्येक विदयार्थी हा झोकून देऊन अभ्यास करत असतो. मात्र आपला प्रेक्षकांचा लाडका बालकलाकार पार्थ भालेराव हा चित्रपटाच्या चित्रकरणामध्ये व्यग्र होता. पार्थचे नुकतेच दोन ते तीन चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण झाल्याचे समजत आहे. त्याचे हे आगामी चित्रपट नवीन वर्षी प्रदर्शित होणार असल्याचेदेखील कळत आहे. त्याचबरोबर एका आगामी चित्रपटात मराठी इंडस्ट्रीचा तगडा कलाकार संतोष जुवेकरसोबत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव ए असणार आहे. या चित्रपटाचे सादरकर्ते अवधूत गुप्ते असल्याचे समजत आहे. आपला बारावीचा अभ्यास सांभाळून पार्थने चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केल्याचे कळत आहे. अशा या मराठी इडस्ट्रींच्या बालकलाकाराने बॉलिवुडमध्येदेखील आपली जागा निर्माण केली आहे. त्याने बॉलिवुडमध्ये पहिल्याच चित्रपटात मोठी झेप घेतली आहे. कारण त्याने बॉलिवुडमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत भूतनाथ रिटर्न्स हा चित्रपट केला आहे. त्यामुळे या चित्रपटातील पार्थच्या अभिनयाचे फार कौतुक करण्यात आले होते. तसेच बिग बींनी देखील स्वत: त्याच्या अभिनयाची प्रशंसा केली होती. त्याचबरोबर राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाºया किल्ला या चित्रपटातदेखील पार्थ प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. अपसाइड डाउन, लालबागची राणी,तुकारम, वीस म्हणजे वीस , डिस्को सन्या या चित्रपटामध्येदेखील पार्थ झळकला होता. अशा प्रकारे बालकलाकार पार्थ भालेरावचे एका पाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत राहिले आहे.