Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिस्को सन्यामध्ये पार्थचा लीड रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 13:53 IST

                     तुम्हाला बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा भुतनाथ रिटर्न हा ...

                     तुम्हाला बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा भुतनाथ रिटर्न हा सिनेमा आठवतोय का. या सिनेमात दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांच्यासोबत बिग स्क्रीन शेअर केलेला अवलीया म्हणजे पार्थ भालेराव. पार्थने पहिल्याच चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केल्यानंतर बिग बी म्हणाले होते या चित्रपटात पार्थ भालेराव हा हिरो होता आणि मी झिरो. अमिताभजींची एक झलक पाहण्यासाठी वेडे असलेल़्या लोकांची तर लंबी लीस्ट आहे. परंतू या पठ्ठ्याने थेट आपल्या शहंशासोबत काम करुन सर्वांनाच वेड लावले होते. आता पार्थ त्याच्या आगामी डिस्को सन्या या चित्रपटातून प्रथमच प्रमुख भुमिकेत येत आहे. पार्थने अनेक सिनेमांमधुन त्याच्या अभिनयाची झलक तर आपल्याला दाखविलीच आहे. व त्याच्या उत्कृष्ठ अभिनयामुळे हे सिनेमे कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये देखील झळकले आहेत. भुतनाथ रिटर्न्स मधील पार्थच्या कमाल अभिनयामुळे त्याला ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ््यात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता डिस्को सन्या या चित्रपटातून पार्थ एकदम धमाकेदान एन्ट्री घेणार आहे. नूकताच या सिनेमाचा टिजर रिलिज करण्यात आला आहे. या चित्रपटात पार्थ रस्त्यावर राहणाºया मुलाची भुमिका करीत असुन त्याच्या संवेदनशील अभिनयाने तो प्रेक्षकांना खिळवणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सचिन पुरोहित व अभिजीत कवठाळकर यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन नियाज मुजावर यांनी केले आहे. येत्या काही दिवसातच या चित्रपटाचे पैलु आपल्यासमोर उलगडतील.