Join us
Daily Top 2Weekly Top 5

पिंकथॉन बिगेस्ट वुमन्स रनचा मिताली मयेकर बनणार हिस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 18:29 IST

उर्फी या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री मिताली मयेकर हिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. आता ही अभिनेत्री फ्रेशर्स या मालिकेच्या माध्यमातून ...

उर्फी या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री मिताली मयेकर हिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. आता ही अभिनेत्री फ्रेशर्स या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय ठरत आहे. अशी ही बेधडक आणि बिंधास मिताली मयेकर हिने कमी वेळातच तिच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. मिताली ही मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीस आली पण आता ठाणेकरांना मिताली एका वेगळ्या माध्यमातून भेटणार आहे. बाळकूम ठाणे येथे १९ मार्चला होणाºया पिंकथॉनचा मिताली हिस्सा असणार आहे. महिलांचे सशक्तीकरण हा उद्देश असलेले पिंकथॉन आता ठाण्यात देखील आयोजित करण्यात आले आहे आणि त्यामध्ये मिलिंद सोमण व सोनाली कुलकर्णी या दिग्गजांसोबत मिताली ही आजच्या युथचे प्रतिनिधित्व करणार आहे. पिंकथॉनसाठी उत्सुक असलेल्या मितालीने मिलिंद सोमण आणि सोनाली कुलकर्णी सोबतचे फोटोज सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या पिंकथॉनमध्ये ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद द्यावा असे आवाहन देखील मितालीने केले. प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्रीनेआजच्या युथवर एक प्रकारची मोहिनीच घातली आहे. आजची तरुणाई सायलीच्या प्रेमात आहे. आपली प्रेयसी सायली सारखीच सुंदर, हुशार आणि बिनधास्त असावी. तिच्याबरोबर आपल्याला बºयाच गोष्टी शेअर करता आल्या पाहिजेत अशा काहीशा कल्पनांमध्ये आजची तरुणाई स्वप्न बघत आहे. तिच्या चाहत्यांची संख्यासुद्धा दिवसें दिवस वाढत आहे. मिताली यापूर्वी तू माझा सांगती, असंभव, उंच माझा झोका अशा अनेक मालिकांच्या माध्यमातूनदेखील पाहायला मिळाली. आता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रेक्षकांना  वेगळया अंदाजात १९ मार्चला पाहायला मिळणार आहे.