Join us

पर्ण पेठेचा साडीमधील हा लूक पाहिला का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 14:46 IST

आगामी काळात पर्ण पेठे मोहित टाकळकर यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणाचा पहिला चित्रपट असलेल्या मीडियम स्पाईसीमधून झळकणार आहे.

'विहीर', 'रमा माधव', 'वायझेड', 'फोटोकॉपी' अशा चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे पर्ण पेठे. अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत पर्ण पेठे तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते. हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो पर्ण पेठे सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळतात. नुकतंच पर्णने एक फोटोशूट केले आहे. हेच फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

यांत तिने निळ्या रंगाची साडी आणि त्याला साजेसा ब्लाउज परिधान केला आहे. यामध्ये पर्ण पेठेचा लूक तितकाच घायाळ करणारा आहे. आगामी काळात पर्ण पेठे मोहित टाकळकर यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणाचा पहिला चित्रपट असलेल्या मीडियम स्पाईसीमधून झळकणार आहे. यांत ललित प्रभाकर, सई ताम्हणकर यांच्या भूमिका असून ललित मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

पर्ण पेठेमध्ये अभिनयासह दडली आहे ही कला, जाणून घ्या कोणती आहे ती कला?

कुणाला जेवण बनवणं, कुणाला गायनाचा तर कुणाला फिरण्याचा छंद असतो. असाच काहीसा छंद मराठमोळी अभिनेत्री पर्ण पेठे हिलाही आहे. पर्ण ही एक उत्तम चित्रकार असल्याचं समोर आले आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक पेंटिंग पोस्ट केले होतं. या चित्राला तिने ‘आमचं घर’ असं कॅप्शन दिले होते. तिनं काढलेले हे चित्र पाहून तुम्हालाही आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. 

टॅग्स :पर्ण पेठे