Join us

पर्ण पेठेच्या ह्या आगामी सिनेमाची वर्णी लागली 'मामी फेस्टिव्हल'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 19:26 IST

पर्ण पेठेने तिचा आगामी सिनेमा अश्लील उद्योग मित्र मंडळचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. यात तिचासोबत अभिनेता अभय महाजन दिसणार आहे

ठळक मुद्देपर्णचा नवरा आलोक राजवाडे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे

पर्ण पेठेने तिचा आगामी सिनेमा अश्लील उद्योग मित्र मंडळचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. यात तिचासोबत अभिनेता अभय महाजन दिसणार आहे. मामी फिल्म फेस्टिवलला नुकतीच सुरुवात झाली आहे. यात 30 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला हा सिनेमा दाखवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती खुद्द पर्णाने सोशल मीडियावर दिली आहे.

पर्णचा नवरा आलोक राजवाडे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची कथा धर्माधिकारी सुमंत यांनी लिहीली असून या चित्रपटामध्ये अभिनेता अभय महाजन प्रमुख भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री पर्ण पेठे त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा पोस्टर पर्ण व सई ताम्हणकरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे या चित्रपटात सई देखील असणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. या चित्रपटाच्या कथेबाबत अद्याप काहीही समजू शकलेले नाही. 

आलोकने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अनेक चित्रपटाच्या दिग्दर्शनाचीही जबाबदारी स्वीकारल्याचे पाहायला मिळाले आहे. ‘तिची सात प्रकरणं’, ‘गेली एकवीस वर्ष’, ‘दिल -ए-नादान’, ‘नाटक नको’ यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे आता आलोक पुन्हा एकदा ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून रसिकांच्या समोर येणार आहे. प्रेक्षक आलोकच्या या आगामी सिनेमाबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

टॅग्स :पर्ण पेठे