Join us

पंकज उदास यांचा ‘मदहोश’ अल्बम रसिकांच्या भेटीला,सुरेश वाडकर यांच्या हस्ते झाले प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 17:38 IST

पदमश्री गायक पंकज उदास यांनी एक से बढकर एक गझल देत   रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारं काही ...

पदमश्री गायक पंकज उदास यांनी एक से बढकर एक गझल देत   रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारं काही विसरायला लावणा-या गझल आजही रसिकांच्या गुणगुणताना दिसतात.असाच काहीसा सांगितिक अनुभव पुन्हा रसिकांना पंकज उदास यांच्या आवाजाच्या माध्यमातून रसिकांना ऐकायला मिळणार आहे. नुकतेच  एका शानदार समारंभात पंकज उदास यांच्या‘मदहोश’ अल्बमचे प्रकाशन सुरेश वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले.पंकज उदास आणि माझी कारकीर्द जवळजवळ एकाचवेळी सुरु झाली. त्यांनी गझल गायनाला एक प्रतिष्ठा मिळून दिली.त्यांच्या ‘मदहोश’चे प्रकाशन माझ्या हस्ते होत आहे,हे मी माझे भाग्य समजतो, पंकज उदास यांची कारकीर्द  दिवसेंदिवस अशीच  बहरत जाईव असे सांगत त्यांच्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुरेश वाडकर यांनी शुभेच्छाही दिल्या.  यावेळी झालेल्या ‘मदहोश’च्या विशेष मैफिलीत यावेळी पंकज उदास यांनी या अल्बममधील काही गाणी सादर केली.त्याशिवाय गेली ३५ वर्षे ते गात असलेल्या आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या आवडत्या गझलही त्यांनी सादर केल्या.संगीत रसिकांसाठी आणि त्यातही पंकज उदास यांच्या चाहत्यांसाठी त्यांचा हा कार्यक्रम जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणारा ठरला.‘मदहोश’ हा नवीन अल्बम आहे आणि त्यात अत्यंत दमदार अशा सहा गझल आहेत.हा अल्बम म्हणजे पंकज उदास यांच्या शैलीचा एक उत्तम नमुना असून त्यातील गीते उत्तम शब्दांनी रचली गेली आहेत.  या नवीन अल्बमविषयी बोलताना पंकज उधास म्हणाले, “मला या अल्बमवर काम करताना खूप समाधान मिळाले, कारण ही भूतकाळात घेऊन जाणारी पंकज उदास शैली आहे आणि नेमकी हीच गोष्ट माझ्या चाहत्यांना बऱ्याच काळापासून हवी होती,  जाणवले, आजपर्यंत रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे माझ्या या नव्या अल्बमलाही रसिक चांगला प्रतिसाद देतील अशी आशा वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.”चिट्ठी आई है’, ‘चांदी जैसा रंग है तेरा’, ‘ना कजरे कि धार’ अशा शानदार गझल देणारे पंकज उदास यांचा हा अल्बम  तरुणांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे.