Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनारी मराठमोळ्या अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 14:01 IST

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

'रुंजी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पल्लवी अजय. सध्या पल्लवी उमेश कामत आणि प्रिया बापटसोबत जर तरची गोष्ट नाटकात झळकते आहे. सध्या या नाटकाची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार ऑस्ट्रेलियात धमाल मस्तीच्या क्षणांची झलक दाखवतायेत.  

अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केलं आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्यासोबतच पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांनी देखील या नाटकामध्ये काम केलं आहे.

जर तरची गोष्ट या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. हे नाटकं पहिल्या दिवसापासूनत हाऊसफुल्ल जातेय. परदेशातही या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या नाटकाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात असलेल्या पल्लवीने तिथलं काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पल्लवी्च्या मागे निळासार समुद्र किनारा दिसतोय. चेहऱ्यावर तिच्या एक वेगळाच आनंद दिसतोय. पल्लवीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. गॉर्जिअस, सुपर, कुल अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.   

दरम्यान पल्लवीने अभिनेता संग्राम समेळ सोबत लग्न केलं होत. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि ते वेगळे झाले. यावर पल्लवी पॉडकास्टमध्ये म्हणाली,"मला लग्नानंतर त्या घरात अॅडजस्ट होता आलं नाही. कारण मी वेगळ्या वातावरणात लहानाची मोठी झाले होते. मी आईवडीलांची काळजी घ्यायचे, कर्तीधर्ती मीच होते. तरी मी खूप प्रयत्न केला पण एका पॉइंटला मी हार मानली आणि घटस्फोट घेतला. परत मी आईबाबांजवळ येऊन राहू लागले तेव्हा मला छान वाटलं."

टॅग्स :सेलिब्रिटी