Join us

सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

By देवेंद्र जाधव | Updated: June 9, 2025 09:13 IST

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीने थाटामाटात लग्न केलं असून तिच्या लग्नाला आदिनाथ कोठारेने खास हजेरी लावली.

काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला 'पाणी' सिनेमा चांगलाच गाजला. आदिनाथ कोठारेने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. 'पाणी' सिनेमात आदिनाथसोबत (adinath kothare) झळकलेली मराठी अभिनेत्री ऋचा वैद्यचं (rucha vaidya) लग्न झालं आहे. ऋचाने थाटामाटात लग्न केलं असून तिच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे. ऋचाने तिच्या सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करुन तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

ऋचा वैद्यने केलं थाटामाटात लग्न

ऋचाचे मित्र-मैत्रीण आणि तिच्या कुटुंबीयांनी तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले आहेत.  यश किरकिरे असं ऋचाच्या नवऱ्याचं नाव आहे. यश आणि ऋचा यांचा काहीच महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. अखेर काल ८ जूनला हे दोघे एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकले. ऋचाच्या लग्नाला 'पाणी' चित्रपटातील तिचा सहकलाकार आदिनाथ कोठारे आला होता. आदिनाथने ऋचा आणि यशसोबत खास सेल्फी काढला.

ऋचाचं वर्कफ्रंट

ऋचाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने २०२४ मध्ये रिलीज झालेल्या 'पाणी' सिनेमात अभिनय केला. अभिनेत्री प्रियंका चोप्राने या सिनेमाची निर्मिती केली होती. सिनेमा सत्य घटनेवर आधारीत होता. आदिनाथ कोठारेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं आणि प्रमुख भूमिका साकारली होती. आदिनाथसोबत या सिनेमात ऋचा झळकली होती. दोघांच्या जोडीचं खूप कौतुक झालं. याशिवाय ऋचाने 'जोधा अकबर' या हिंदी सिनेमात काम केलंय. लवकरच ऋचा 'प्रेमाची गोष्ट २' या मराठी सिनेमात झळकणार आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतामराठीआदिनाथ कोठारे