Join us

ऑस्कर बॉय सनी पवार झळकणार मराठी सिनेमात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 17:41 IST

'मूर्ती लहान, पण किर्ती महान' अशी सनी पवार विषयी जगभरात सुरु आहे.'लायन' सिनेमामुळे ऑस्करपर्यंत पोहचलेल्या सनीने हॉलिवूडमध्येही आपल्या कौशल्याने ...

'मूर्ती लहान, पण किर्ती महान' अशी सनी पवार विषयी जगभरात सुरु आहे.'लायन' सिनेमामुळे ऑस्करपर्यंत पोहचलेल्या सनीने हॉलिवूडमध्येही आपल्या कौशल्याने रसिकांची मनं जिकली.'लायन' सिनेमानंतर 'लव्ह सोनिया' सिनेमातही तो झळकणार आहे.या सिनेमात फ्रिदा पिंटो आणि रिचा चढ्ढासह तो रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे दोन मेगाप्रोजेक्टमध्ये काम केल्यानंतर मराठी सिनेमांकडेही सनी वळणार असल्याचे कळतेय.सनीच्या कुटुंबानेही सनीने मराठी सिनेमातही झळकावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे हॉलिवूडपर्यंत मजल मारणारा सनी मराठी सिनेमातही काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे कळते आहे.सनी पवार मुंबईत येताच त्याचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.त्यानंतर दुपारी  शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची कुंटुबियाह  मातोश्रीवर त्याने  भेटही घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सनीचे खूप कौतुकही केले.सनीला पुष्पगुच्छ देवून त्याचा सत्कारही केला.त्यामुळे 'मुर्ती लहान, किर्ती महान' सनीचा डंका आता जगभर वाजू लागला आहे. हॉलिवूडमध्येही त्याला खूप प्रेम मिळाले.आता मराठी सिनेमात सनी कधी झळकणार असाच प्रश्न रसिकांना पडला आहे. मात्र सनीच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार सनी लवकरच मराठी रूपेरी पडद्यावर झळकणार आणि मराठी रसिकांचेही मनं जिकंणार असा त्यांना विश्वास असल्याचे त्याच्या कुंटुबियांनी  म्हटले आहे. सनीच्या अभिनयाची झलक जगभरातल्या रसिकांनी अनुभवली आहे. आता सनीच्या अदाकारीचा जलवा त्याचे कुटुंबीय तसंच मुंबईच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचा-यांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासाठी सनीच्या अभिनयाची जादू असलेल्या 'लायन' सिनेमाचा विशेष प्रिमीयर सोहळा आयोजित करण्यात आला आहे.मुंबईतल्या कलिना परिसरातील एका झोपडपट्टीत छोट्याशा घरात राहणारा सनी एअर इंडिया मॉर्डन स्कूलमध्ये शिकतोय. त्यामुळे या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासाठी हा क्षण तितकाच खास असणार आहे. कारण सनी हा या शाळेचा पहिला विद्यार्थी आहे. ज्याने शाळेचे नाव देशातच नाही तर जगभरात उंचावले आहे. या प्रिमीयरच्या माध्यमातून जगभरातील रसिकांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या आपल्या लाडक्या सनीच्या अभिनयाची जादू या सा-यांना या प्रिमीयरच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.