Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदिरंग महोत्सवचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 10:52 IST

आदिवासी संस्कृतीची ओळख व्हावी या हेतूने राष्ट्रीय नाट्य विद्यालय आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय ...

आदिवासी संस्कृतीची ओळख व्हावी या हेतूने राष्ट्रीय नाट्य विद्यालय आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय आदिवासी लोककलेवर आधारित आदिरंग महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे रंगणार आहे. या महोत्सवात आदिवासी लोककला, नाट्य, संगीत, नृत्य आणि हस्तकला आदींचा संक्षिप्त परिचय करुन देण्यात येणार आहे. तसेच भारतीय आदिवासी सांस्कृतिक वारसा दर्शवणारे प्रदर्शन हा देखील या महोत्सवाचा एक महत्वाचा घटक आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आदिवासी कला, पारंपारिक आदिवासी वाद्य, दागिने, पोशाख, चित्रे आणि देशाच्या विभिन्न भागातील घरघूती वस्तू यांचा वारसा दाखविण्यात येणार आहे. आदिवासी कला आणि कलाप्रकारांचा संक्षिप्त परिचय मुल्लू हेग्गे कुनिता, पालखी नृत्य व कातखेल नृत्य, चांदी, मामिता नृत्य, गेयोम्जा नृत्य, लहौषा नृत्य, नगाडा नृत्य, पैका किंवा चाउ नृत्य, घासियारी नृत्य, जूट-बुडी नृत्य, बैगा परधानी नृत्य, सिंघरी नृत्य, राईबेनषा नृत्य, पुली नृत्य , कानियार कली नृत्य, चक्री, सोंगी मुखवटे, मयाली अट्टम, कामसले, तेराटली, सिखरी सिखला, तलवार नृत्य, कामताची मयाली नृत्य व जबारो व मुखवटा नृत्य देखील सादर केले जाणार आहे. तसेच देशातील ७०० पेक्षा अधिक आदिवासी कलाकार या महोत्सवात सहभागी होणार असून विविध विषयांवरील परिसंवादाचे आयोजनही या फेस्टिव्हलमध्ये करण्यात आले आहे. अशा या भारताच्या कानाकोपºयातील जमाती विशेषत: ईशान्येकडील सात राज्यांमधील काही जमाती, त्यांच्या परंपरा आणि संस्कृती, श्रद्धा, त्यांच्या मान्यता, त्यांचे विधी मुख्य प्रवाहापासून अजूनही दूर आहेत. त्यामुळे या संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी हा प्रयत्न असणार आहे. हा महोत्सव २९ ते ३१ डिसेंबर रंगणार आहे.