Join us

OMG! समिधा गुरू दोन महिन्यांच्या सुट्टीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 12:28 IST

आजच्या धावत्या युगात प्रत्येक व्यक्तीचे कामाचे व्याप वाढले आहे. या स्पर्धेच्या युगातून थोडा वेळ ब्रेक घेण्याचे प्रत्येकाची इच्छा असते. ...

आजच्या धावत्या युगात प्रत्येक व्यक्तीचे कामाचे व्याप वाढले आहे. या स्पर्धेच्या युगातून थोडा वेळ ब्रेक घेण्याचे प्रत्येकाची इच्छा असते. कारण रोजच्या कामाच्या व्यापापासून दूर होऊन पुन्हा उत्साहाने सकारात्मक काम करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती ही छोटा ब्रेक घेत असते. तर या सर्व गोष्टीमध्ये कलाकार तरी कसे मागे राहतील. कॅमेरा, अ‍ॅक्शन, रिटेक अशा चंदेरी दुनियेतील बिझी शेडयुल्डपासून थोडा रिलीप मिळावा यासाठी कलाकार हॉलिडेवर जात असल्याचे पाहायला मिळत असतात.             आता हेच पाहा ना, अवघाचि संसार, कमला,देवयानी अशा लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचे मनं जिंकणारी अभिनेत्री समिधा गुरू हीदेखील सध्या दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाणार असल्याचे तिने लोकमत सीएनएक्सला सांगितले. समिधा सांगते, आताच मी माझ्या एका चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. त्याचबरोबर क्राईम पेट्रोलचेदेखील काही चित्रिकरण संपविले आहे. आता या बिझी शेडयुल्डमधून छोटा ब्रेक घेत आहे. माझा हा ब्रेक मी दोन महिन्यांसाठी घेत असल्याचे तिने यावेळी सांगितले. त्याचबरोबर या दोन महिन्यांमध्ये मी माझा पूर्ण वेळ फॅमिलीला देणार आहे. मी मूळची नागपूरची आहे. त्यामुळे आता या दोन महिन्यांमध्ये फॅमिलीला मुंबईमध्ये शिफ्ट करण्याचा विचार सुरू आहे. ही दोन महिन्यांची सुट्टी फक्त फॅमिलीबरोबरच घालविणार आहे. समिधाने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. तिने खलनायिकेच्या भूमिकेतदेखील आपल्या अभिनयाचा छाप उमटविला आहे. मालिकांप्रमाणेच तिने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपटदेखील दिले आहेत. यामध्ये पन्हाळा, कापूस कोंडयाची गोष्ट, तुकाराम, कायदयाचं बोला अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.