Join us

आता, कला आणि क्रीडा संबंध ही नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 13:51 IST

बेनझीर जमादार उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून निघून जावे अशी मागणी सर्व  स्तरातून होऊ होतेय.  या मागणीला घेऊन ...

बेनझीर जमादार
 
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून निघून जावे अशी मागणी सर्व  स्तरातून होऊ होतेय.  या मागणीला घेऊन जो वाद निर्माण झाला त्याला इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन अर्थात इम्पा या संस्थेने पूर्णविराम लावला आहे. इम्पा संस्थेन सर्वसाधारण सभेत कुठल्याही पाकिस्तानी कलाकाराला यापुढे काम न देण्याचा निर्णय घेतला आहे. इम्पाने घेतलेल्या या निर्णयाविषयी मराठी कलाकारांना काय वाटते हे जाणून घेतले आहे लोकमत सीएनएक्सने. 
शरद पोंक्षे-  खरंच इम्पाने घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आता, पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही. मग तो सांस्कृतिक असो या वा क्रीडासंबंधी. ज्या पद्धतीने पाकिस्तानी कलाकारांचे लोंढेच्या लोंढे आपल्या देशात येत होते त्या गोष्टीला या निर्णयामुळे पूर्णविराम लागेल. त्यामुळे  इम्पाच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. 
 
रेणुका शहाणे -  इम्पा या संस्थेने घेतलेला निर्णय योग्यच आहे. आपण इकडे पाकिस्तानातून आलेल्या कलाकारांवर भरभरुन  करत असतानाच काश्मीरमध्ये मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या. याला सडेतोड उत्तर देण्याची गरज होती. अशावेळी एक भारतीय नागरिक म्हणून इम्पाने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करते. 
 
विजय पाटकर -  इम्पाच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आतापर्यंत आपण जो मनाचा  मोठेपणा दाखवत होतो तो आता पुरे झाला.  तिथे सीमेवर आपले जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद होत आहेत.  सांस्कृतिक, कला, क्रीडा प्रेम खूप झाले. आता प्रथम देशाचा विचार केला गेला पाहिजे. इम्पाने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. अलका कुबल - कलाकारांसाठी जात, धर्म, पंत या गोष्टी मी मानत नाही. पण आता भारत- पाकिस्तानामध्ये जे काही चाललं आहे. त्या पार्श्वभूमीवर इम्पा या संस्थेचा निर्णय बरोबर आहे.  जो राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे.  
 
प्रसाद ओक - आपल्याकडे कलाकौशल्य असणारे विविध कलाकार आहेत. आपल्या कलाकारांना डावलून जो देश आपल्यावर दहशतवादी हल्ले करत होता त्या देशातल्या कलाकारांना आपण का व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे इम्पाने घेतलेला निर्णय उत्तम आहे.