Join us

​आता हा मराठी अभिनेता बनला बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 15:20 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून सध्या अनेक गोड बातम्या ऐकायला मिळत आहेत. प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशी नुकताच बाबा बनला. त्याची ...

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून सध्या अनेक गोड बातम्या ऐकायला मिळत आहेत. प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशी नुकताच बाबा बनला. त्याची पत्नी लीनाने काहीच दिवसांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला. स्वप्निल आणि लीनाला याआधी मायरा ही मुलगी आहे. आता स्वप्निलनंतर आणखी एका अभिनेत्याने गुड न्यूज दिली आहे. पुष्कर जोगने अनेक मराठी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. मालिकेतील त्याच्या भूमिकांचे देखील नेहमीच कौतुक केले जाते. पुष्कर सध्या खूपच खूश आहे. कारण त्याच्या घरात एका नन्ही परीचे आगमन झाले आहे. पुष्करची पत्नी जास्मिन ब्राहमभट्टने एका गोंडस मुलीला नुकताच जन्म दिला आहे. पुष्करनेच सोशल मीडियाद्वारे ही गुड न्यूज त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. जास्मिन गरोदर असताना जास्मिन आणि पुष्करने छानसे फोटो शूट केले होते. त्या फोटो शूट मधील हा फोटो असून या फोटोवर त्याने लिहिले आहे की आमच्या कुटुंबात एका नव्या सदस्याचा प्रवेश झाला आहे. एक चिमुकली आमच्या आयुष्यात आली आहे. पुष्करने पोस्ट केलेल्या या फोटोला अनेक लाइक्स मिळत असून अनेकजण कमेंट द्वारे पुष्करला शुभेच्छा देत आहेत. जास्मिन ही एक हवाईसुंदरी आहे. एका विमान प्रवासादरम्यानच पुष्कर आणि जास्मिनच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. त्यांनी काहीच महिन्यांच्या अफेअरनंतर लग्न केले. पुष्कर आणि जास्मिनने २६ नोव्हेंबर २०१४ला पुण्यात लग्न केले होते. अगदी नेमके पाहुणे आणि नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता.पुष्कर जोगने बालकलाकार म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सून लाडकी सासरची, रावसाहेब, साखरपुडा यांसारख्या मराठी चित्रपटात त्याने बालकलाकाराची भूमिका साकारली. त्यानंतर जबरदस्त, मिशन पॉसिबल, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या चित्रपटांमध्ये तो नायकाच्या भूमिकेत झळकला. त्याने वचन दिले तू मला, धूमशान यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. पुष्करने काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. Also Read : पुष्करच्या आयुष्यातला आनंदाचा 'तो' क्षण कोणता ?