Join us

​...आता ‘सैराट’ची अशीही क्रेझ !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 18:28 IST

खाद्य पदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांना सतत लोकप्रिय गोष्टींचा ध्यास लागलेला असतो. आपला ब्रँड पॉप्यूलर करण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात. सध्या ...

खाद्य पदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांना सतत लोकप्रिय गोष्टींचा ध्यास लागलेला असतो. आपला ब्रँड पॉप्यूलर करण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात. सध्या 'सैराट' हा ब्रँड झालाय. या नावाभोवती एक वलय तयार झालंय. याचाच फायदा एका वेफर्स बनवणाऱ्या कंपनीने उचललाय.सैराटच्या नावाचा फायदा घेणाऱ्या वेफर्स कंपनीनेही यातील  ‘मराठीत सांगितलेलं कळत नाय, आता काय इंग्लिशमध्ये सांगू’ या डायलॉगचा वापर चक्क आपल्या ब्रँडच्या जाहिरातीत केलाय. कॉपी राईट अ‍ॅक्टची किती माहिती हे बनवणाऱ्या कंपनीला आहे हे माहिती नाही. यासाठी 'सैराट'चा लोगोही वापरलाय. असो तर 'सैराट' या ब्रँडचा उपयोग वेफर्ससाठी झालाय. पाऊचवर किंमतही छापलीय फक्त ५ रुपये, मराठीत सांगितलेलं कळत नाय, आता काय इंग्लिशमध्ये सांगू !