Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा पेंडसेची बहिणही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, 'बिनधास्त' सिनेमात साकारली होती भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 09:00 IST

नेही पेंडसे आणि मीनल या दोघी सख्या बहिणी असल्याचे फारसे लोकांना माहिती नाही. कारण मीडियासमोर दोन्ही एकत्र आल्या नाहीत.

वेगळ्या धाटणीचे आणि वेगळा विषय असलेले मराठी सिनेमा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले.त्यातला बिनधास्त या मराठी सिनेमानेही रसिकांची भरघोस पसंती मिळवली होती. सिनेमातल्या भूमिकांचेही विशेष कौतुक झाले होते. सिनेमातल्या दोन व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरल्या होत्या.  मयुरी आणि वैजयंती या दोघी मैत्रिणींना त्यांच्या कॉलेजची मैत्रीण शीला खुनाच्या आरोपात कसे फसवते असे दाखवण्यात आले होते. शिलाची भूमिका साकारली होती अभिनेत्री मीनल पेंडसेने. 

या आरोपांमुळे शीला एका फार्महाऊसमध्ये लपून बसलेली असते तिचा शोध मयुरी आणि वैजयंती घेत असतात. अर्थात या सर्व घटनांमागे एसीपी निशा मॅडमचा हात असतो याचा उलगडा सिनेमाच्या शेवटी होतो. या सिनेमानंतर  २००२साली प्रदर्शित झालेल्या 'आधारस्तंभ' या  मराठी सिनेमात ती झळकली होती. या सिनेमात तिने साकारलेल्या सिनेमाचेही फार कौतुक झाले होते. 

सिनेमातून प्रकाशझोतात आलेली मीनल पेंडसे ही अभिनेत्री नेहा पेडंसेची सख्खी बहिण आहे.मीनलाही नेहा इतकीच सुंदर दिसते. आता काळानुसार तिच्यातही फार बदल झाला असला तरी सौंदर्याच्या बाबतीत आजही पूर्वीइतकीच सुंदर आहे. सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या  पूर्वीचा लूक आणि आत्ताच्या लूकमध्ये कमालीचा बदल झाल्याचे तुमच्याही लक्षात येईल.व्हायरल झालेल्या फोटोंना चाहतेही लाईक्स आणि कमेंट्स करत पसंती देत असल्याचे पाहयला मिळते.

नेही पेंडसे आणि मीनल या दोघी सख्या बहिणी असल्याचे फारसे लोकांना माहिती नाही. कारण मीडियासमोर दोन्ही एकत्र आल्या नाहीत.त्यामुळे त्यांच्या या दोन्ही बहिणींच्या चर्चा फार कमी ऐकायला मिळतात. नेहा पेंडसे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. पण मीनल सोशल मीनल फारशी सक्रीय नाही. त्यामुळे तिच्याविषयीच्या खास अपडेटही समोर येत नाही. नेहा पेंडसे मराठीतच नाही तर हिंदी टीव्ही विश्वातही तितकीच प्रसिद्ध आहे. 

नेहा ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. तिचे  व्हिडीओची सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असतात. या व्हिडीओने तिच्या फॅन्सना आणि सोशल मीडियावर साऱ्यांनाच अक्षरक्ष: वेड लावतात. तिचे हे वर्कआऊट व्हिडीओ अनेकांना वर्कआऊटसाठी प्रेरणा देत असते. 

टॅग्स :नेहा पेंडसे