Join us

'फक्त त्याची बायको म्हणूनच नव्हे तर…', अंकुश चौधरीची पत्नी दीपाची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 13:17 IST

Ankush Chaudhari And Deepa Chaudhari : दीपा चौधरी हिने सोशल मीडियावर अंकुशचे फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.

अभिनेता अंकुश चौधरी(Ankush Chaudhari)चा नुकताच महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात त्याने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. तर त्याची पत्नी दीपा चौधरी (Deepa Chaudhari) हिने त्याच्यासाठी लिहिलेली पोस्ट खूप चर्चेत आली आहे. दीपाने सोशल मीडियावर ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील अंकुशचे काही फोटो पोस्ट केले.

दीपा चौधरी हिने सोशल मीडियावर अंकुशचे फोटो पोस्ट शेअर करत लिहिले की, आज १ मे, महाराष्ट्र दिन…. २८ एप्रिलला अंकुशचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. खरे तर मी तो एक दिवस आधीच पाहिला होता आणि तेव्हापासून मी पूर्णतः निःशब्द झाले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी मला माझ्या प्रतिक्रिया विचारल्या पण काय बोलू? काय सांगू? कळतच नव्हतं. फक्त अंकुशची बायको म्हणूनच नव्हे तर एक कलाकार म्हणून, एक सुजाण प्रेक्षक म्हणून ह्या कलाकृतीने मला खूप काही दिलं, शिकवलं, घडवलं आणि मुख्य म्हणजे माझ्याच माणसांची मला नव्याने ओळख करुन दिली. 

पुढे तिने लिहिले की, बायको म्हणून मला अंकुशचा खूप खूप खूप अभिमान वाटतो. आज फक्त त्याची बायको म्हणून नाही तर त्याची फॅन म्हणून सुद्धा मी पुन्हा एकदा नव्याने त्याच्या प्रेमात पडले. या चित्रपटासाठी एक अभिनेता म्हणून त्याने घेतलेल्या मेहनतीची मी स्वतः साक्षीदार आहे. ‘याची देही याची डोळा’ ज्यांना बघत, ज्यांच्या सहवासात त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली त्यांचीच भूमिका आज साकारायला मिळणं यासारखा दुग्धशर्करा योग नव्हे. आणि यासाठी त्याने घेतलेल्या मेहनतीचे बळ कदाचित बाबांकडून त्यांना मिळाले असावे. चित्रपट बघताना काही क्षणानंतर अंकुश चौधरी दिसतच नाहीत आणि दिसतात ते पूर्णतः शाहीर साबळे, अभिनेता म्हणूनच नव्हे तर वास्तविक आयुष्यात क्षणिक का होई ना पण तुम्ही ही भूमिका आत्मसात करीत ती जगलात हेच एक अभिनेता म्हणून तुमचे यश आहे.

दीपा चौधरीची ही पोस्ट चर्चेत आली आहे. दीपाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती सध्या झी मराठी वाहिनीवरील तु चाल पुढं या मालिकेत काम करताना दिसते आहे. 

टॅग्स :अंकुश चौधरी