Join us

निशिगंधा वाड-दीपक देऊळकरची लेक सौंदर्यात अभिनेत्रींना देते टक्कर, गणेशोत्सवातील फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 19:10 IST

Nishigandha Wad-Deepak Dewoolkar : अभिनेत्री निशिगंधा वाड आणि अभिनेता दीपक देऊळकर यांची लेक चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. नुकतेच सोशल मीडियावर तिचे फोटो समोर आले आहेत.

नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने अभिनेत्री निशिगंधा वाड (Nishigandha Wad) आणि अभिनेता दीपक देऊळकर (Deepak Dewoolkar) यांनी रसिकांना भुरळ घातली. या दोघांनी अनेक सिनेमा आणि मालिकेत काम केले. सध्या दीपक देऊळकर सिनेइंडस्ट्रीत फारसे सक्रीय नाहीत. पण निशिगंधा वाड मालिकेत काम करताना दिसतात. आता या जोडप्याची लेक चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. निशिगंधा वाड यांची मुलगी हुबेहूब आईची कॉपी आहे. नुकतेच सोशल मीडियावर तिचे फोटो समोर आले आहेत. 

निशिगंधा आणि अभिनेते दीपक देऊळकर यांच्या लेकीचं नाव ईश्वरी देऊळकर आहे. ती दिसायला अतिशय सुंदर आहे. ईश्वरी सोशल मीडियावर सक्रिय असते आणि ती तिचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती हुबेहूब तिच्या आईसारखीच दिसते. ती सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींना टक्कर देते. नुकतेच ईश्वरीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने गणेशोत्सवादरम्यानचे निशिगंधा आणि दीपक यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

ईश्वरी देऊळकरने मुंबईतील सिटी इंटरनॅशनल स्कुलमधून शिक्षण घेतलं आणि आता तिने पदवीचं शिक्षणदेखील पूर्ण केलं आहे. 'श्री गुरुदेवदत्त' या मालिकेच्या सेटवरसुद्धा ती अनेकदा आपल्या आई वडिलांसोबत यायची. तिने अद्याप तिच्या करिअरच्या बाबतीत निर्णय घेतलेला नाही. दीपक देऊळकर आणि निशिगंधा वाड या दोघांनी मिळून ईश्वरीच्या नावाने ईश्वरी व्हिजन निर्मिती संस्था उभारली आहे. याच निर्मिती संस्थेतून त्यांनी 'श्री गुरुदेवदत्त' मालिकेची निर्मिती केली होती.

टॅग्स :निशिगंधा वाड