Join us
Daily Top 2Weekly Top 5

नशिबवान तापसी नाना सोबत दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 20:08 IST

अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत काम करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. कोणाला ही संधी लवकर मिळते, तर कुणाला ...

अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत काम करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. कोणाला ही संधी लवकर मिळते, तर कुणाला मात्र त्यासाठी प्रतिक्षा करावी लागते.अभिनेत्री तापसी पन्नू मात्र याबाबतीत लकी आहे. आताच इंडस्ट्रीत आलेल्या तापसीला फार लवकर नानांसोबत काम करण्याची संधी मिळाली असून, माझ्यासाठी ही सुवर्णसंधी असल्याचं तापसीचं म्हणणं आहे. दिग्दर्शक प्रकाश राज यांच्या आगामी ‘तडका’ या सिनेमात तापसी आणि नाना एकत्र काम करणार आहेत. ‘उन समयन अरायील’ या तामिळ सिनेमाचा हा रिमेक असून अली फझल आणि श्रिया सरन हे दोघेसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.