Join us
Daily Top 2Weekly Top 5

'राजा शिवाजी' सिनेमातील गाण्यावर निक्की तांबोळीने बनवला रील व्हिडीओ, जिनिलीया देशमुख कमेंट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:08 IST

'राजा शिवाजी' सिनेमाचं अँथम साँग सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यावर बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळीने रील व्हिडीओ बनवला आहे. 

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. 'राजा शिवाजी'चा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या ट्रेलरआधीच सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. 'राजा शिवाजी' सिनेमाचं अँथम साँग सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यावर बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळीने रील व्हिडीओ बनवला आहे. 

निक्कीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हा रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने पारपंरिक मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. डिझायनर नऊवारी साडी आणि त्यावर पारंपरिक ज्वेलरी परिधान केली आहे. कपाळावर चंद्रकोर लावल्याने निक्कीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. "वारसा कधीच पुसला जात नाही. शिवरायांची कहाणी आजही जगतो आहोत", असं कॅप्शन निक्कीने या व्हिडीओला दिलं आहे. निक्कीचा रील व्हिडीओ पाहून जिनिलीयाही थक्क झाली आहे. तिने निक्कीच्या व्हिडीओवर कमेंट करत "थँक्यू निक्की" असं म्हटलं आहे. 

'राजा शिवाजी' सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं आहे. या सिनेमात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर जिनिलीया देशमुख राणी सईबाईंच्या भूमिकेत आहेत. या सिनेमात बॉलिवूड कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळत आहे. अभिषेक बच्चन संभाजी महाराज, संजय दत्त अफजल खान, भाग्यश्री माँसाहेब जिजाऊ यांच्या भूमिका साकारणार आहेत. याशिवाय फरदीन खान, जितेंद्र जोशी, बोमन इराणी, महेश मांजरेकर, विद्या बालन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या १ मे रोजी 'राजा शिवाजी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nikki Tamboli's Reel on 'Raja Shivaji' Song, Genelia Reacts

Web Summary : Nikki Tamboli created a reel video on the trending 'Raja Shivaji' anthem song. Dressed in traditional attire, she impressed Genelia Deshmukh, who commented with appreciation. The film, directed by Riteish Deshmukh, stars a Bollywood cast and releases on May 1st.
टॅग्स :राजा शिवाजी चित्रपटजेनेलिया डिसूजा