Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सैराट मधील ‘लंगड्या’ दिसणार नव्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 14:40 IST

‘सैराट’ सध्या सुसाट वेगान धावत आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिके तील आर्ची आणि परशाप्रमाणेच लंगडा बाळ्या आणि सल्याने अवघ्या महाराष्ट्राला ...

‘सैराट’ सध्या सुसाट वेगान धावत आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिके तील आर्ची आणि परशाप्रमाणेच लंगडा बाळ्या आणि सल्याने अवघ्या महाराष्ट्राला याड लावले.  प्रेक्षकांनी आर्ची-परशालाच नव्हे तर सल्या आणि लंगड्याच्या भूमिकेलाही भरभरुन दाद दिली. चित्रपटातील लंगड्याच्या भूमिकेतील तानाजी गलगुंडे आता आपल्याला नव्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र तो कोणत्या सिनेमात नाही तर झेरॉक्स मशिनवर काम करताना दिसेल.पंचायत समितीतर्फे तानाजीला रोजगाराचे साधन म्हणून अपंग कोट्यातून झेरॉक्स मशिन दिलं जाणार आहे. पायाने अपंग असल्याने तानाजी गलगुंडेला आता रोजगाराचं साधन मिळणार आहे. तानाजीच्या सत्कारासाठी आयोजित कार्यक्रमात पंचायत समितीचे उपसभापती तुकाराम ढवळे यांनी ही घोषणा केली. तानाजीला येत्या ६ जून रोजी हे झेरॉक्स मशिन दिलं जाईल. त्यामुळे सिनेमातील प्रदीप बनसोडे आता खºया आयुष्यात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. तानाजी सध्या सोलापुरातील टेंभूर्णी इथे बीएच्या प्रथम वर्षात शिकत आहे.