Join us

सायली संजीव मराठीचा नवीन चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 06:47 IST

मराठी चित्रपटांमध्ये सध्या दिवसागणिक नवीन चेहर्‍यांची भर पडत आहे. यामध्ये आता सायली संजीव हे नावदेखील समाविष्ट झाले आहे. एक ...

मराठी चित्रपटांमध्ये सध्या दिवसागणिक नवीन चेहर्‍यांची भर पडत आहे. यामध्ये आता सायली संजीव हे नावदेखील समाविष्ट झाले आहे. एक चुणचुणीत मुलगी हिरॉईनच्या मैत्रिणीच्या रोलसाठी ऑडिशन द्यायला जाते काय अन् तिची अभिनयक्षमता पाहून चक्क मुख्य भूमिकेसाठी ती निवडली जाते काय? अगदी एखाद्या चित्रपटाची वाटावी अशी ही स्टोरी; पण अभिनेत्री सायली संजीवला आलेला हा वास्तव अनुभव.  'पोलीसलाईन'मधून ती मराठीत पदार्पण करीत आहे. पु. ल. देशपांडे एकांकिका स्पर्धेत उत्कृष्ट उच्चारांसाठीचं पारितोषिक पटकावून आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारी सायली सुशांत शेलारसह एका व्हिडिओ अल्बममधून प्रथमच कॅमेर्‍यासमोर आली. अनेक जाहिरातींच्या तिला ऑफरही आल्या. करिअरच्या सुरुवातीलाच 'पोलीसलाईन' सारख्या संवेदनशील व आशयसंपन्न फिल्ममध्ये मुख्य भूमिका करायला मिळत असल्याने खूष असल्याचे सायली सांगते.