Join us

नाविण्य आणि भव्यतेचा भन्नाट अनुभव म्हणजे '३१ दिवस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 19:00 IST

सिनेमाची कथा आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय म्हणजेच 'मराठी सिनेमा' अशी व्याख्या करताना '३१ दिवस' सिनेमात दाखविलेला ग्रॅंजर नजरे आड करता येणार नाही.

ठळक मुद्देअथिरापल्ली या प्रसिद्ध धबधब्यावर या सिनेमातील रोमँटिक गाण्याचं चित्रीकरण झालं.

सिनेमाची कथा आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय म्हणजेच 'मराठी सिनेमा' अशी व्याख्या करताना '३१ दिवस' सिनेमात दाखविलेला ग्रॅंजर नजरे आड करता येणार नाही. खरंतर या सिनेमामुळे कथा-अभिनयासोबत सिनेमाची निर्मिती मूल्य प्रेक्षकांना आवडतील यावर लक्ष वेधलं आहे. फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी.एस. बाबू निर्मित, उमेश जंगम लिखित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित '३१ दिवस' हा सिनेमा येत्या २० जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. खरंतर निर्माता-दिग्दर्शकाची ही  मराठीतील पहिली वाहिली कलाकृती असल्यामुळे डोळ्यात तेल घालून ही मंडळी चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे यशस्वी वाटचाल करत आहेत.

बाहुबली सिनेमाचे चित्रीकरण झालेल्या केरळ मधील अथिरापल्ली या प्रसिद्ध धबधब्यावर या सिनेमातील रोमँटिक गाण्याचं चित्रीकरण झालं आहे. दुधाळ फेसाळणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या बॅकड्रॉपवर अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री मयुरी देशमुख यांच्यातील फुलणाऱ्या अलगद प्रेमाची सुंदर आणि नयनरम्य सुरुवात पाहून आपल्याही डोळ्यांचे पारणे फिटतील. तसंच अल्लेपीतील बॅकवॉटर्सचा देखील अप्रतिम नैसर्गिक आस्वाद प्रेक्षक मनोमन घेतील. उत्तम श्रवणीय 'मन का असे'... या गाण्याने सिनेमाला चारचाँद लावले आहेत. अंगावर शहारा आणेल असा काळजाचा ठोका चुकवणारा १२ मिनिटांचा क्लायमॅक्स स्टंट डिरेक्टर सुनील रॉड्रिक्स यांनी दिग्दर्शित केला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या सिनेमांचं स्टंट डिरेक्शन त्यांनी केलं आहे.  सिनेमाची उत्कंठा वाढवणारा हा क्लायमॅक्स चित्रित करण्यासाठी तब्बल ४ दिवसांचा वेळ लागला होता. आतापर्यँतच्या सगळ्या  एकंदरीत '३१ दिवस' म्हणजे ''पैसा वसूल'' अशी प्रतिक्रिया प्रेक्षक येत्या २० जुलै रोजी देतील अशी आशा आहे.  

टॅग्स :शशांक केतकर