Join us
Daily Top 2Weekly Top 5

रॅपर श्रेयशचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 15:08 IST

आम्ही पुणेरी' आणि ' वीर मराठे' या मराठमोळ्या रॅपसाँगच्या यशानंतर खास आपल्या चाहत्यांसाठी मराठी रॅपर, किंग जेडी उर्फ श्रेयश ...

आम्ही पुणेरी' आणि ' वीर मराठे' या मराठमोळ्या रॅपसाँगच्या यशानंतर खास आपल्या चाहत्यांसाठी मराठी रॅपर, किंग जेडी उर्फ श्रेयश जाधव  'फकाट पार्टी'  देत आहे. नुकतेच त्याचे हे गाणे लोकांसमोर सादर करण्यात आले असून, त्याच्या आतापर्यंतच्या सर्व रॅपसाँगप्रमाणे हे गाणेदेखील प्रेक्षकांना आवडतील असा अंदाज आहे. एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली सादर होणा-या या पार्टीसाँगला हर्ष, करण, अदित्य यांनी संगीत दिले असून, सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन तसेच कॉरियोग्राफी केली आहे. श्रेयशने गायलेल्या या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात १०० ग्लॅमरर्स मॉडेल्सना घेण्यात आले असून त्यात फॉरेनर्सचादेखील समावेश आहे''फकाट पार्टी' या नावातूनच ह्या गाण्यातील धम्माल लक्षात येऊ शकते. मुळात 'रॅप' सॉंग म्हंटले तर डोळ्यासमोर एक वेगळाच नजारा उभा राहतो. हनी सिंग, रफ्तार, बादशाह यांच्या रॅपगाण्यातील एट पाहिली असता, तरुणवर्गाला त्यांची भुरळ पडली नाही तर नवलच! मात्र, श्रेयशने आतापर्यंत 'आम्ही पुणेरी' आणि ' वीर मराठे' या दोन गाण्यांमधून हार्डकोअर कॉन्टेन्टफुल ''रॅप' चे एक वेगळे स्वरूप लोकांसमोर सादर केले होते. परंतु त्याचे 'फकाट पार्टी' हे रॅपसॉंग त्याहून अगदी वेगळे आणि पॉपगाण्याशी सलग्न असे आहे. श्रेयश च्या सगळ्याच गाण्यांमध्ये इंग्रजी तसेच हिंदी रॅपसाँगला साजेल असा रुबाब पाहायला मिळतो, मराठीतील या आगळ्यावेगळ्या डिस्को रॅप साँगमध्ये अलिशान गाड्या, ग्लॅमरर्स मुली आणि चंगळ असे बरेच काही पाहायला मिळते.  मराठी चित्रपट सृष्टीचा तरुण निर्माता, रॅप सिंगर व गीतकार म्हणून श्रेयशने आता चांगलाच जम बसवला असून त्याच्या एकामागोमाग एक हिट होत असलेल्या  त्याच्या रॅपसाँमुळे. श्रेयश हा मराठी पॉप इंडस्ट्रीमध्ये एक नवीन क्रांती आणतोय असे म्हणायला आता हरकत नाही.