Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा पेंडसेचा बोल्ड लूक पाहून नेटकरी नाराज, काय आहे नेमकं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 10:41 IST

Nehha Pendse : नुकतीच नेहा पेंडसे एका इव्हेंटला गेली होती. त्या इव्हेंटसाठी तिने लॉंग गाउन परिधान केला होता. तिचा हा लूक पाहून नेटकरी नाराज झाले आहेत.

कलाकार वेगवेगळ्या कारणांमुळे बऱ्याचदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असतात. मग कधी त्यांच्या विधानांमुळे तर कधी कपड्यांमुळे. नेटकऱ्यांना कलाकारांची एखादी गोष्ट खटकली की, ते त्यांना चांगलेच ट्रोल करतात. असंच काहीसं अभिनेत्री नेहा पेंडसे(Nehha Pendse)च्या बाबतीत घडलं आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे, या व्हिडीओवरून तिला चांगलंच ट्रोल करण्यात आले आहे. नुकतीच नेहा पेंडसे एका इव्हेंटला गेली होती. त्या इव्हेंटसाठी तिने लॉंग गाउन परिधान केला होता. तिचा हा लूक पाहून नेटकरी नाराज झाले आहेत. 

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने इव्हेंटसाठी लॉंग गाउन घातला होता. ज्याला एका पायाच्या इथून कट होता. त्यासोबत तिने गळ्यात डायमंड नेकलेस आणि हातात त्याच रंगाची अंगठी परिधान केली होती. मात्र तिच्या या लूकमुळे ती ट्रोल झाली आहे. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात ती पापाराझींना फोटो काढण्यासाठी पोझ देताना पायाकडे कट असलेल्या ठिकाणाहून ड्रेस साइडला करताना दिसते आहे. ते पाहून नेटकरी नाराज झालेत आणि ते तिला त्यावरुन ट्रोल करत आहेत.

ट्रोलर्स म्हणाले...एका युजरने लिहिले की, काय दाखवायचं आहे. तर दुसऱ्याने म्हटले की, सांभाळता येत नाही तर चादरसारखा ड्रेस का परिधान करायचा. तर आणखी एका युजरने लिहिले की, मांडी दाखवणं इतकं गरजेचं आहे का? ड्रेस ताणून ताणून बाजूला केलाय. तर एकाने वय वाढतंय तशी ड्रेसची लांबी कमी होतेय अशी कमेंट केली आहे.

वर्कफ्रंट...नेहा पेंडसेने तिच्या करिअरमध्ये केवळ हिंदीच नाही तर मराठी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. तिने चित्रपटांमध्येही दमदार अभिनय केला आहे. पण सगळ्यात जास्त लोकप्रिय झाली होती ती संजना हितेशीच्या भूमिकेतून जी तिने 'मे आय कम इन मॅडम?' मध्ये साकारली होती. ही मालिका प्रेक्षकांच्या परत भेटीला आली असून त्यात पाहायला मिळत आहे.

टॅग्स :नेहा पेंडसे