Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा पेंडसेचे फोटो का होतायेत व्हायरल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 08:00 IST

नेहा तिच्या बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. नेहाने तिच्या पोल डान्स आणि वर्कआऊटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.

अभिनेत्री नेहा पेंडसेच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्याचे पाहायला मिळते.नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पुलशेजारी बिकीनमध्ये दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये नेहा तिच्या हॉटेलच्या रुममध्ये दिसते आहे.नेहा तिच्या बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. नेहाने तिच्या पोल डान्स आणि वर्कआऊटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.

तिच्या या व्हिडीओपासून अनेकांना वर्कआऊटची प्रेरणा मिळाली असेल आणि तेही फिटनेसबाबत सजग झाले असतील.नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे. 

नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती एका मध्यवर्गीय कुटुंबातील आहे, तिचे वडील हे बिझनेसमन असून आई ही गृहिणी आहे. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता. केवळ १० वर्षांची असताना तिने सगळ्यात पहिल्यांदा कॅमेराला फेस केले होते. त्यावेळी तिला त्या कामाचे ५०० रुपये मिळाले होते. हे पैसे तिने तिच्या पालकांना दिले होते. तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम केले आहे. 

मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून ती सर्वांच्या ओळखीचा चेहरा बनलेली आहे.मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करण्याआधी तिने दक्षिण भारतीय चित्रपटांमधून काम केलं होतं.झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या टीव्ही सिरीअलमध्ये तिने सहनशील गृहिणीची भूमिका केली होती.तर हिंदीमध्ये ‘मे आय कम इन मॅडम’ या विनोदी मालिकेत तिने हॉट लेडी बॉसची भूमिका साकारली होती.

 

टॅग्स :नेहा पेंडसे