Join us

नेहा पेंडसेने सोशलमिडीयावर केली कानउघडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 17:48 IST

 कलाकारांना चाहत्यांपर्यथ प्रत्यक्ष पोहचण्यासाठी सोशलमिडीया हे एक उत्तम माध्यम आहे. पण काही जण याचा गैरवापर देखील करताना दिसतात. अशाच ...

 कलाकारांना चाहत्यांपर्यथ प्रत्यक्ष पोहचण्यासाठी सोशलमिडीया हे एक उत्तम माध्यम आहे. पण काही जण याचा गैरवापर देखील करताना दिसतात. अशाच एका टवाळकराची कानउघडणी अभिनेत्री नेहा पेंडसेने केली.तसेच तिच्या या कानउघडणीमुळे तिच्या मित्र कलाकारांनीदेखील तिचे कौतूक केले आहे. अभिनेत्री नेहा पेंडसेच्या आॅफिशिअल ट्विटर अकाऊण्टवर असाच एका टवाळखोराने नेहा पेंडसेच्या ट्विटर अकाऊण्टवर अश्लील कमेंट केली. अनेक कलाकार अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करतात, मात्र नेहाने या टवाळखोराला चांगलाच धडा शिकविला. संबंधित ट्वीट कोट करुन तिने आपला संताप व्यक्त केला. महिलांचं अशाप्रकारे कौतुक करतात का? किळस आहे. लाज वाटायला हवी अशा शब्दात तिने त्याला झापलं नेहा पेंडसेच्या हिमतीला अनेकांनी दाद दिली. अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेने नेहा पेंडसेसोबत मुंबई पोलिसांना टॅग केलं आणि टवाळाची तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी यासारख्या कलाकारांनीही नेहाला पाठिंबा देत आरोपीला धारेवर धरल