Join us

मराठी चित्रपटातील हॉट अ‍ॅक्ट्रेस नेहा पेंडसेंच्या साडीतील अदांनी चाहत्यांना केलं घायाळ, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 06:30 IST

नेहाने सोशल मीडियावर साडीतील फोटो शेअर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसेच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसेच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. मात्र नुकताच तिने शेअर केलेल्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण दरवेळेस बोल्ड अदांनी रसिकांना घायाळ करणाऱ्या नेहाने यावेळेस आपल्या साडीतील सौंदर्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

नेहाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने बेबी पिंक रंगाची फ्लॉवरची प्रिंट असलेली साडी नेसलेली पहायला मिळतेय. या फोटोत ती खूप सुंदर व सोज्वळ दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वी नेहाने  बॉयफ्रेंड शार्दुल सिंग बयास  रोमँटिक फोटो शेअर केला आहे आणि हार्टचं चिन्ह टाकलं होते. या फोटोवरुन नेहा लवकरच शार्दुल सिंग बयास या बिझनेसमनसोबत लग्नबेडीत अडकणार असल्याची चर्चा होती. 

नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती एका मध्यवर्गीय कुटुंबातील आहे, तिचे वडील हे बिझनेसमन असून आई ही गृहिणी आहे. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता.

 नेहाने अनेक मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शोमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करण्याआधी तिने दक्षिण भारतीय चित्रपटांमधून देखील काम केलं होतं. 

टॅग्स :नेहा पेंडसे