Join us

नेहा पेंडसे म्हणतेय ‘कूल’ है हम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 17:07 IST

सूर्यनारायण आता चांगलाच तळपतो आहे... अंगाची लाही लाही करणारं ऊन आणि घामाच्या धारा यामुळे सारेच हैराण झालेत. मग या ...

सूर्यनारायण आता चांगलाच तळपतो आहे... अंगाची लाही लाही करणारं ऊन आणि घामाच्या धारा यामुळे सारेच हैराण झालेत. मग या उन्हापासून सेलिब्रिटी मंडळीसुद्धा कसे वाचतील. बरेच सेलिब्रिटी तर सिनेमा आणि मालिकांच्या शूटिंगमध्ये बिझी असतात.. 12 ते 14 तास हे सेलिब्रिटी आऊटडोअर असतात. अशा परिस्थितीत उन्हाच्या झळा त्यांनाही बसतात.कितीही गरम होत असले तरी आपले कलाकार त्यापासून वाचू शकत नाहीत. इनडोआर किंवा आऊटडोअर कसेही चित्रीकरण असेल तरी त्यांना गर्मीमध्ये ही काम हे करावेच लागते. जड पोशाख आणि मेकअपसोबत त्यांना आपले सर्वोत्तम देत परफॉर्म करावे लागते.  त्यामुळे घरातून बाहेर सेटवर असताना सेलिब्रिटी मंडळी उन्हाचा सामना करताना काही स्मार्ट गोष्टी करत आहेत.अभिनेत्री नेहा पेंडसे स्वतःला गर्मीपासून वाचवून थंड करण्यासाठी अॅनाकोंडा म्हणजेच एका मोठ्‌या आकाराच्या स्पायरल पंख्यासमोर उभी राहत हवा घेत असते.याबद्दल ती म्हणाली, “आम्हांला खूप वेळ शूटिंग करावे लागते आणि ह्या गर्मीमध्ये अॅनाकोंडा माझा बेस्ट फ्रेंड आहे. दुपारच्या वेळेस ३ ते ६ मध्ये जेव्हा माझी एनर्जी सगळ्‌यात कमी असते तेव्हा मी शहाळ्‌याचे थंड पाणी किंवा फ्रूट ज्यूस पिते. लिंबूपाणी पिऊन मी स्वतःला हायड्रेट करते.”त्यामुळं मेकअप असतानाही गार वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामुळं मन कूल आणि शांत राहतं.या छोट्या छोट्या गोष्टी आचरणात आणलं की उन्हाळा तुम्हीही एन्जॉय कराल असे नेहाने म्हटले आहे.