Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर पहिल्यांदाच नेहा पेंडसेने साजरा केला गुढीपाडवा, फोटो शेअर करत दिल्या सर्वांना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 10:51 IST

लग्नानंतर पहिल्यांदाच नेहा पेंडसेने गुढीपाडवा साजरा केला

मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नेहा 5 जानेवारी, 2020 ला पुण्यात बिझनेसमन शार्दुल बयाससोबत विवाहबंधनात अडकली. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने तिने लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा सण साजरा केला. तिने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

नेहा पेंडसे हिने इंस्टाग्रामवर गुढी पाडवा सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत लिहिले की, लग्नानंतर क्वारंटाईनमध्ये माझा पहिला गुढीपाडवा सण साजरा केला. झी टॉकीजचे आभार. गेल्यावर्षी दिलेल्या गुढीने आजचा आम्हाला वाचवले. सगळ्यांनी सुरक्षित रहा आणि घरी रहा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या अनेक शुभेच्छा.

लग्नात नेहाने फिकट गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. नाकात पारंपरिक मोठी नथ, चंद्रकोर, हिरवा चुडा आणि केसांत गजरा यांमुळे नेहाचा लुक खुलून दिसत होता.नेहाने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो फॅन्ससोबत शेअर केले होते. नेहाने लग्नात घेतला उखाणा देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लग्नाच्या एक दिवस अगोदर नेहाचा साखरपुडा झाला. तिथेच संगीत सेरेमनीमध्येही नेहा आणि शार्दुलने मस्ती केली. या दोन्ही फंक्शनचे फोटो नेहाने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. नेहा सध्या एका मराठी चित्रपटात काम करते आहे. त्यामुळे ती खूप बिझी आहे. तिने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटासोबत तिच्या हनीमून प्लानिंगबद्दल सांगितलं.

नेहा म्हणाली की, मराठी चित्रपटानंतर आणखीन एका प्रोजेक्टचे काम सुरू होणार आहे. त्याचे शूटिंग बाकी आहे. काम संपल्यानंतर हनीमूनला जाणार आहे. हनीमूनसाठी जापानची निवड केली आहे. कामामुळे एप्रिलमध्ये बाहेर जाणार आहे.

टॅग्स :नेहा पेंडसेगुढीपाडवा