Join us

OMG! मराठी चित्रपटसृष्टीतील या हॉट आणि बोल्ड अभिनेत्रीची झाली एगेंजमेंट?, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 13:39 IST

मराठी चित्रपटसृष्टीत या वर्षभरात काही कलाकारांचा साखरपुडा व विवाह पार पडला. त्यात आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीनं नुकताच आपल्या जोडीदाराचा फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसेच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसेच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. मात्र नुकताच तिने शेअर केलेल्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोत तर ती ग्लॅमरस दिसते आहे. मात्र या फोटोत तिच्यासोबत एक व्यक्ती पहायला मिळतो आहे. 

नेहाने एका व्यक्तीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे आणि हार्टचं चिन्ह टाकलं आहे. हा फोटो इटलीत काढण्यात आला आहे.  या फोटोत तिच्या बोटात रिंग पहायला मिळते आहे. तिच्यासोबत असलेला हा व्यक्ती कोण आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र तिचा हा फोटो व रिंग पाहून तिची एगेंजमेंट झाल्याचं वाटतं आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

नेहाची बेस्ट फ्रेंड श्रृती मराठे हिने देखील ओह माय गॉड असं म्हणत हार्ट सिम्बॉल टाकलं आहे. तिच्या या फोटोवर कधी झालं सगळं असे प्रश्न विचारत आहेत.  याबाबत आता ती कधी सांगते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती एका मध्यवर्गीय कुटुंबातील आहे, तिचे वडील हे बिझनेसमन असून आई ही गृहिणी आहे. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता.

केवळ १० वर्षांची असताना तिने सगळ्यात पहिल्यांदा कॅमेराला फेस केले होते. त्यावेळी तिला त्या कामाचे ५०० रुपये मिळाले होते. हे पैसे तिने तिच्या पालकांना दिले होते. तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम केले आहे. 

नेहाने अनेक मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शोमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करण्याआधी तिने दक्षिण भारतीय चित्रपटांमधून देखील काम केलं होतं.

झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या मालिकेत तिने सहनशील गृहिणीची भूमिका केली होती. तिची ही मालिका चांगलीच गाजली होती. 

टॅग्स :नेहा पेंडसेश्रुती मराठे