Join us

३५% काठावर पास चित्रपट पोस्टपोंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 11:10 IST

सतीश मोतलिंग निर्मित आणि दिग्दर्शित या बहुचर्चित ३५% काठावर पास चित्रपटाचे प्रदर्शन येत्या २० मे रोजी होणार होते. परंतु सध्या ...

सतीश मोतलिंग निर्मित आणि दिग्दर्शित या बहुचर्चित ३५% काठावर पास चित्रपटाचे प्रदर्शन येत्या २० मे रोजी होणार होते. परंतु सध्या धुमधडाक्यात सुरु असलेल्या सैराटच्या घोडदौडीला लगाम लागू नये आणि सैराट सर्व चित्रपटगृहांत तसाच सुरु राहावा या व्यापक दृष्टीकोनातून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून २९ जुलै  रोजी हा चित्रपट सर्व महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय निमार्ते आणि दिग्दर्शक सतीश मोतलिंग यांनी घेतला आहे. यावर बोलताना ते म्हणले की,सैराट हा अत्यंत सुंदर चित्रपट नागराज मंजुळेसारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाने बनवला आहे, या चित्रपटाच्या गतीला कोणतेही बंधन येऊ नये आणि महाराष्ट्राच्या कानाकोपºयातील प्रत्येकापर्यंत हा चित्रपट पोहचवा..शक्य तितका काळ तो चित्रपटगृहात टिकून राहावा यासाठी आम्ही हा निर्णय घेत आहोत. ३५% काठावर पास च्या टीमचं या निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे.